प्रियांकाने पहिल्यांदाच सरोगेट मातृत्त्वाबद्दलच...

प्रियांकाने पहिल्यांदाच सरोगेट मातृत्त्वाबद्दलच्या तिच्या वेदना व्यक्त केल्या, बोलली – ‘मी त्यावेळेस कोणत्या परिस्थितीतून गेले हे सांगू शकत नाही.’ (I was being accused of ‘renting’ a womb and purchasing a ‘ready-made baby’ Priynaka Chopra Reveals netizens accused her after she opted for surrogacy)

ग्लोबल आयकॉन बनलेल्या प्रियांका चोप्रा जोनासने पुन्हा एकदा देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे. ब्रिटिश वोग मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. नुकतेच तिने मुलगी मालतीसोबत या मासिकासाठी फोटोशूट केले आहे. शूटनंतर, प्रियांकाने मासिकासाठी एक मुलाखत देखील दिली, ज्यामध्ये प्रियांकाने पहिल्यांदाच सरोगसीद्वारे मालतीच्या जन्मानंतर लोकांनी तिला कसे ट्रोल केले आणि तिने हे सर्व कसे हाताळले हे सांगितले.

प्रियांका २०२१ मध्ये सरोगसीद्वारे एका मुलीची आई झाली, तिचे नाव तिने मालती मेरी चोप्रा जोनास ठेवले. आई झाल्याची गोड बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली. एकीकडे प्रियांका आई झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच दुसरीकडे सरोगसीचा मार्ग निवडल्याबद्दल लोक तिला ट्रोल करत होते. आता प्रियांका याबद्दल उघडपणे बोलली आहे आणि लोकांच्या तिच्याबद्दलच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर तिला कसे वाटले आणि तिने सरोगसीचा मार्ग का निवडला हे देखील तिने सांगितले आहे.

प्रियांकाने नुकतेच वोग मॅगझिनसाठी मुलगी मालतीसोबतचे पहिले फोटोशूट केले आहे, ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावर देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये आई आणि मुलगी खूपच क्यूट दिसत आहेत. यासोबतच तिने सांगितले की, मालतीच्या जन्मानंतर लोकांनी तिची खूप निंदा केली. “तिने तिची गर्भधारणाच आउटसोर्स केली आहे. भाड्याच्या गर्भातून मूल आणले. सरोगसीच्या माध्यमातून रेडिमेड बाळ मिळवले, असे बरेचसे वाईटसाइट बोल लोकांनी लावले,” असे ती म्हणाली. प्रियांका पुढे म्हणाली, “जेव्हा लोक माझ्याबद्दल बोलतात तेव्हा मी स्वतःला मजबूत बनवते, पण जेव्हा ते माझ्या मुलीबद्दल बोलतात तेव्हा खूप त्रास होतो. माझ्या मुलीला यापासून दूर ठेवा.”

प्रियांकाने आई होण्यासाठी सरोगसीचा मार्ग का निवडला याचा खुलासाही केला. “मला मेडिकल कॉम्प्लिकेशंस होत्या. म्हणून सरोगसीचा मार्ग निवडणे आवश्यक होते आणि नशीबाने मी हे पाऊल उचलण्याच्या स्थितीत होते. आमची सरोगेट खूप गोड आणि छान होती जिने आम्हाला इतकी मौल्यवान भेट दिली.”

प्रियांका तिच्या मुलाखतीत म्हणाली, “मी कोणत्या परिस्थितीतून गेले आहे, त्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही.  मला माझा वैद्यकीय इतिहास सांगायचा नाही. मालतीला जन्मानंतर १०० दिवस एनआयसीयूमध्ये राहावे लागले. डॉक्टर तिची नस शोधण्याचा प्रयत्न करत असताना मी तिचे छोटे हात हातात धरले होते. तेव्हा मला काय वाटले होते हे फक्त मलाच माहीत आहे. म्हणूनच मी माझ्या आयुष्यातील या क्षणाबद्दल आणि माझ्या मुलीच्या बाबत खूप संरक्षणात्मक आहे. ती कोणाच्याही गॉसिपचा भाग बनणार नाही. हे फक्त माझेच नाही तर तिचेही जीवन आहे.

प्रियंका चोप्राने डिसेंबर २०१८ साली राजस्थानमध्ये गायक निक जोनाससोबत लग्न केले. या जोडप्याने जानेवारी २०२१ मध्ये सरोगेसीद्वारे त्यांच्या मुलीच्या जन्माची बातमी जाहीर केली आणि गोपनीयतेची विनंती देखील केली. प्रियांका मेरी मालतीचे फोटो वरचेवर शेअर करत असते परंतु त्यांनी अजूनही तिचा चेहरा उघड होऊ दिलेला नाही.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)