‘माझी छाती, कंबर यांची मापे काढली जात होत...
‘माझी छाती, कंबर यांची मापे काढली जात होती’ – कास्टिंग काऊच बाबत सुरविन चावलाचा गौप्य्स्फोट (‘I Was Asked About My Chest, Waist Size’- Surveen Chawla Opens Up On Casting Couch)

अभिनेत्री सुरविन चावलाने (Surveen Chawla) आपल्या हिंमतीवर चित्रउद्योगात नाव कमावले आहे. मात्र टेलिव्हिजन ते चित्रपट हा प्रवास सोपा नव्हता. सुरविनने अलीकडेच एका मुलाखतीत आपल्यावर गुदरलेल्या कास्टींग काऊच (Casting Couch) प्रकारांचा गौप्यस्फोट केला आहे.
दाक्षिणात्य चित्रसृष्टीबाबत तिनं स्पष्टपणे सांगितलं आहे की, तिकडे हे प्रकार सर्रास चालतात. सिनेसृष्टीत प्रवेश करण्यासाठी आपण मुंबईत आलो, तेव्हा माझी कंबर आणि छातीच्या आकारावरून मला प्रश्न विचारले गेले, असंही तिनं सांगितलं. यामुळे आपल्या रूपाबाबत मला शंका येऊ लागली, असं ती सांगते.

डी-कपल्ड या वेब शो च्या प्रमोशन वेळी आरजे सिध्दार्थ कानन यांच्याशी बातचीत झाली, तेव्हा सुरविनने हा खुलासा केला आहे.
तिनं पुढे असंही सांगितले की, आता बरेच बदल होत आहेत. आधी एका निर्मात्याने, मांडया दाखविण्यास सांगितले होते. टीव्ही वर तू इतकी झळकली आहेस, आता तुला सिनेमात काम मिळणार नाही, असं बोलून तिला काही लोकांनी नाउमेद केलं होतं.

सुरविन चावलाने बरेच टीव्ही शोज आणि दक्षिणेकडील चित्रपट केले आहेत. ती बोल्ड आहे, पण अभिनयातही चमक तिनं दाखवली आहे.