कॅन्सरच्या प्रवासावर पहिल्यांदा व्यक्त झाला संज...

कॅन्सरच्या प्रवासावर पहिल्यांदा व्यक्त झाला संजय दत्त, म्हणाला मी मरायला तयार होतो पण मला कीमोथेरपी घ्यायची नव्हती(‘I was alone. My wife, family, my sisters, no one was there with me’ Sanjay Dutt opens up on his cancer journey: ‘I will just die but I don’t want any treatment’)

संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. पण आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर त्यांनी मात केली. 2020 मध्ये जेव्हा त्याला कॅन्सर झाल्याचे समजले तेव्हा तो खूपच खचून गेला होता. त्याला स्टेज 4 फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता, परंतु त्याने कर्करोगाशी देखील लढा दिला. संजय दत्त आता पहिल्यांदाच त्याच्या कॅन्सरच्या प्रवासावर व्यक्त झाला आहे.

संजय दत्त अलीकडेच बहीण प्रियांका दत्तसोबत हॉस्पिटलच्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता, तिथे त्याने त्याला कॅन्सर कसा झाला होता तेव्हा त्याची काय हालत झाली होती ते शेअर केले.तो म्हणाला, “मला पाठीत तीव्र वेदना होत होत्या. मी पेन किलर घ्यायचो आणि गरम पाण्याचा शेक घ्यायचो. एके दिवशी अचानक मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, म्हणून मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये मी एकटाच होतो. त्यावेळी माझी पत्नी, बहिणी, कुटुंब, कोणीही माझ्यासोबत नव्हते. अचानक एक व्यक्ती आली आणि मला कॅन्सर झाल्याचे सांगितले. मान्यता दुबईत असताना प्रिया माझ्याकडे आली.माझी आई आणि पत्नी रिचा शर्मा यांचे कर्करोगाने निधन झाले होते. म्हणून जेव्हा मला कर्करोगाचे निदान झाले तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती की मी कीमोथेरपी घेणार नाही. मला मरायचे असेल तर मी मरेन, पण माझ्यावर उपचार होणार नाहीत.

कॅन्सरच्या प्रवासाविषयी बोलताना संजय पुढे म्हणाला, “मग माझ्या लक्षात आले की माझे कुटुंब तुटत आहे. मला वाटले की मला काही झाले तर यांचे पण तुकडे होतील. ते आजारीही पडतील. म्हणूनच मी कर्करोगाशी लढा आणि उपचार घेण्याचे ठरवले. स्वत:ला बळ द्यावे लागेल, असे संजयने सांगितले.

संजय दत्त असेही म्हणाला की, लोक सहसा आपला आजार लपवतात. त्याबद्दल बोलत नाहीत. पण मी माझ्या आजाराबद्दल काहीही लपवले नाही. मी तसे केले जेणेकरून मी गरजू लोकांना मदत करू शकेन.