माझ्यावर काळी जादू करणारी चेटकीण, असा आरोप झाला...

माझ्यावर काळी जादू करणारी चेटकीण, असा आरोप झाला होता, कंगणा रणावतने उघडली गत जीवनाची पाने(‘ I Was Alleged Of Performing Black Magic ‘- Kangana Ranaut Makes Revelations Of Her Past)

आपल्या बिनधास्त वागण्यासाठी आणि बेताल बोलण्यासाठी अभिनेत्री कंगणा रणावत प्रसिद्ध आहे. आता पुन्हा एकदा कंगणाने इन्स्टाग्रामवर टाकलेली पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने एका जगप्रसिद्ध सद्गुरुंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, ते दिवस आठवले जेव्हा एका संपादकाने माझ्यावर काळी जादू केल्याचा आरोप केला होता असे लिहिले.

कंगणाने पोस्ट केलेल्या व्हिडिओत 200 वर्षांपूर्वी महिलांना कसे डायन म्हणून जिवंत जाळले जायचे ते सांगितले आहे. तुमच्याकडे सुपर पॉवर असतील तर तुम्हाला डायन म्हटले जाईल. मला सुद्धा डायन म्हटले जायचे पण मी स्वतःला उलटे जळू दिले नाही…..हा हा हा…मी खरी डायन आहे… आबरा का डाबरा…” कंगना हे गमतीने म्हणाली असली तरी तिच्या बोलण्याचा रोख हा काळी जादू करणाऱ्यांविरोधातच होता.

कंगनाने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या संपादकाने मी काळी जादू करते असा दावा केला होता. 2016 मध्ये, त्या संपादकाने लिहिले होते की, यश मिळविण्यासाठी मी काळ्या जादूचा वापर करते.  याशिवाय मी मासिक पाळीचे रक्त लाडूमध्ये मिसळून ते दिवाळी गिफ्ट म्हणून वाटले. ज्या दिवसांमध्ये या काळ्या जादूच्या बातम्या आल्या होत्या ते दिवस खूप मजेशीर होते. कंगणा पुढे म्हणाली, ‘कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी, एजन्सी, बॉयफ्रेंड नसतानाही मी त्यावेळी आघाडीवर होते. आणि माझ्या या यशाला सर्वांनी मिळून ‘काळी जादू’ असे नाव दिले.

अभिनेता अध्ययन सुमननेही कंगनावर काळी जादू केल्याचा आरोप केला होता. कंगणा 2008 ते 2009 दरम्यान काही महिने अध्ययन सुमनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ब्रेकअपनंतर कंगनावर काळी जादू केल्याचा आरोप अध्ययन सुमनने केला होता. कंगणाने आपल्याला तिचे मासिक पाळीचे रक्त प्यायला लावल्याचा आरोप अध्ययन केला होता. अध्ययनच्या या विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.