श्रीदेवीच्या पुण्यतिथी निमित्त जान्हवी कपूरची भ...

श्रीदेवीच्या पुण्यतिथी निमित्त जान्हवी कपूरची भावनिक पोस्ट, म्हणाली मी आजही तुला सगळीकडे शोधते(‘I still look for you everywhere Mumma’: Janhvi Kapoor Pens Emotional Note for Late Mother Sridevi)

जान्हवी कपूर नेहमीच आपल्या बोल्ड लूक्समुळे चर्चेत असते. तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर लोकांना वेड लावतो. जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिथे ती अनेकदा आपल्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करत असते. आज जान्हवीने आई श्रीदेवीची आठवण करून देणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे

येत्या शुक्रवारी 24 फेब्रुवारीला श्रीदेवीची पाचवी पुण्यतिथी आहे, त्यामुळे जान्हवी खूप भावूक झाली आहे. आईच्या पुण्यतिथीपूर्वी, जान्हवी कपूरने आईची आठवण करून देणारी एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे.

जान्हवी कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर आई श्रीदेवीसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या आईची आठवण करून देणारा भावनिक संदेश लिहिला आहे. जान्हवीने लिहिले- “मम्मा, मी अजूनही तुला सर्वत्र शोधत आहे. मी जे काही करते ते माझ्या कामामुळे तुम्हाला माझा अभिमान वाटेल या आशेने करते. मी कुठेही जाते आणि जे काही करते, माझे सर्व काही तुझ्यापासून सुरू होते आणि तुझ्यापाशीच संपते.”

जान्हवीच्या या इमोशनल पोस्टवर युजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत. सगळे तिला धीर देत आहेत. श्रीदेवी आजही सगळ्यांच्या मनात जिवंत आहे. त्या आजही तुझ्यासोबत आहेत अशा कमेंट चाहते करत आहेत.

श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनीही तिची आठवण काढली आहे. आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर श्रीदेवीचा फोटो शेअर करत बोनीने लिहिले की, “5 वर्षांपूर्वी तू आम्हाला सोडून गेलीस. तुझे प्रेम आणि आठवणी आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. ते नेहमी आमच्या सोबत असतील.