तुनिषाचा वाढदिवसाला तिची आई झाली भावनिक, म्हणाल...

तुनिषाचा वाढदिवसाला तिची आई झाली भावनिक, म्हणाली ती नसली म्हणून काय झालं केक नक्की कापीन (I still feel she will come and call me Mumma, Tunisha Sharma’s mother gets emotional on her Birthday, Says- She will cut her birthday cake Even if she is not there)

तुनिषा शर्माच्या मृत्यूची बातमी अजूनही ताजी आहे. तुनिषा शर्माची आई विनिता शर्मा आणि शीझानचे कुटुंब या अभिनेत्रीच्या मृत्यूसाठी एकमेकांना जबाबदार ठरवत एकमेकांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. तुनिषा शर्माने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी वाढदिवसाच्या 10 दिवस आधी गळफास लावून आत्महत्या केली होती.

आज तिचा वाढदिवस आहे. आज ती हयात असती तर तिचा 21 वा वाढदिवस साजरा केला असता. 21 व्या वाढदिवसानिमित्तही तिने अनेक योजना आखल्या होत्या, मात्र वाढदिवसाच्या 10 दिवस आधी तिने आत्महत्या केली. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिची आई वनिता शर्मा खूप भावूक झाली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने तुनिषाच्या लहानपणापासून आतापर्यंतच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत, तसेच मुलगी तुनिषा शर्माचा वाढदिवस आज कसा साजरा करणार तेही त्यांनी सांगितले.

विनिता शर्माने सांगितले की, तुनिषा लहानपणापासूनच खूप हुशार होती. नृत्य, गायन यांसारख्या कलांमध्ये ती सर्वांत्तम होती. तिने कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही, अभिनयाचेही नाही. सर्व कला तिला देवाने दिल्या होत्या. तुनिषा ही तिच्या शिक्षकांची लाडकी होती. “जेव्हा मी पालक-शिक्षकांच्या मीटिंगला जायचे तेव्हा तिचे शिक्षक म्हणायचे की तुमच्या मुलीची काही तक्रार नाही. शाळा असो की शूटिंग, मला तुनिषाबद्दल कधीच तक्रार आली नाही.

तुनिषाचे तिच्या वडिलांवर खूप प्रेम होते. पण वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी तिने वडील गमावले, हा तिच्यासाठी मोठा धक्का होता. “माझ्या पतीचा २०११ मध्ये मृत्यू झाला, तेव्हा तुनिषा फक्त ९ वर्षांची होती. ती माझ्यापेक्षा तिच्या वडिलांच्या जवळ होती. असा एकही दिवस नव्हता जेव्हा ती तिच्या वडिलांसोबत झोपली नसेल. झोपेतही तिला वडिलांची गरज लागायची. अशा परिस्थितीत तिच्या वडिलांचे निधन झाल्याने ती पूर्णपणे कोलमडून गेली. त्यानंतर आम्ही तीन वर्षांनी मुंबईत आलो.

आज तुनिषाचा वाढदिवस आहे, त्यामुळे तिची आई खूप भावूक झाली होती. “मला काहीही समजत नाही. काय कसं झालं? माझी मुलगी आता या जगात नाही यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. ती कुठूनतरी येईल आणि मम्मा अशी हाक मारेल असं मला अजूनही वाटतंय. तिच्या वाढदिवसाला मी तिला सरप्राईज पार्टी देणार होते आणि मी खूप प्लान केला होता. तिच्या वाढदिवसानिमित्त ती नेहमीच खूप उत्सुक असायची. आजही मी तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. मी तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत केक बनवीन आणि तिच्याशिवाय केक कापेन. तुनिषाच्या आईने सांगितले की, आता ती कायमची चंदीगडला शिफ्ट होणार आहे. “मी फक्त मुंबईत तुनिशासाठी गेले होतो. ती नसेल तर मी इथे काय करू? मी तिच्या आजोबांसोबत चंदीगडला शिफ्ट होईन.

दरम्यान, तुनिषाच्या मृत्यूचे गूढ गुंतागुंतीचे होत आहे. सध्या गौरव भगत नावाच्या मुलासोबत तुनिषाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे खूप जवळ दिसत आहेत, त्या व्हिडिओमुळे असे बोलले जात आहे की शीझान व्यतिरिक्त तुनिषा गौरवसोबत सुद्धा रिलेशनशिपमध्ये होती.