मलायका अरोरानं लाजत सोशल मीडियावर दिला लग्नाला ...

मलायका अरोरानं लाजत सोशल मीडियावर दिला लग्नाला होकार… लिहिलं – मी हो म्हटलं… : चाहते अभिनेत्रीचे अभिनंदन करत आहेत (‘I said YES.’ Malaika Arora’s cryptic Instagram post sparks wedding rumours, Fans send congratulatory messages)

बॉलिवूड दिवा मलायका अरोरा वयाच्या ४९ व्या वर्षीही तिच्या ग्लॅमरस स्टाईलने भल्याभल्यांना मात देते. तिचा किलर आणि स्टनिंग लूक सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. तिच्या फिटनेस इतकेच, तिच्या लव्ह लाईफचे किस्सेही लोकांच्या ओठांवर असतात.

मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असून चाहते त्यांच्या नात्याच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून असतात. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बॉलीवूडचं सगळ्यात हॉट कपल. दोघांच्या लव्हलाईफची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगलेली दिसते. त्यांचे एकत्र असे फोटो देखील व्हायरल होताना दिसतात. दोघं एकमेकांविषयीचं प्रेम बिनधास्त व्यक्त करतानाही नेहमी दिसतात.

पण मलायका अरोरानं आज सकाळी-सकाळी एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ज्यामध्ये ती काळ्या टँक टॉपमध्ये लाजताना आणि हसताना दिसत आहे. तिनं त्या पोस्टला कॅप्शन दिलं आहे की, ”मी हो म्हटलं…”, तिनं आपला बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूरला ही पोस्ट टॅग केली नाही ना त्याचा कुठे पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. तरीही मलायकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. अन्‌ मलायका आणि अर्जुनला शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. कुणी म्हटलंय,’वा..’ तर कुणी ‘ओ… माय गॉड’. मात्र, तिने लग्नाला हो म्हटले आहे की हा तिचा प्रमोशनल स्टंट आहे हे मलायकाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

मलायका आणि अर्जुन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी २०१९ मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवशी आपल्या नात्याला सर्वांसमोर कबूल केले. दोघांच्या लग्नाविषयी देखील लोकांची कुजबूज सुरू होती. आणि अर्जुन कपूरनं देखील आपल्या काही मुलाखतींमधून सांगितलं होतं की मलायकासोबत लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर मी माझ्या चाहत्यांसमोर ही घोषणा करीन.

काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर ‘कॉफी विथ करण’ मध्ये आला होता तेव्हा म्हणाला होता की,”सध्या मी लग्नाचा विचार करत नाही. मी माझं आणि मलायकाचं नातं खूप विचार करून लोकांसमोर आणलं कारण मला माहीत होतं यावर सगळे कसे रिअॅक्ट होतील. मी खूप स्पष्ट विचारांचा माणूस आहे. मी काहीच लपवणार नाही. पण मला अजून आयुष्यात स्थिर व्हायचं आहे. जर मी खूश असेन तर मी माझ्या पार्टनरला खूश ठेवू शकेन”.

मलायका अरोरानं सलमान खानचा लहान भाऊ अभिनेता-निर्माता अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. त्यांना अरहान नावाचा २० वर्षाचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी मलायका आणि अरबाजनं वैचारिक मतभेदांमुळे विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.