बाळाच्या जन्माआधीच आलिया आपले नाव बदलणार, म्हणा...

बाळाच्या जन्माआधीच आलिया आपले नाव बदलणार, म्हणाली मला आता भट्ट म्हणून राहायचे नाही, एकटेपणा वाटतो (‘I Don’t Want To Feel Left Out’ Says Alia Bhatt As She Reveals She Will Change Her Name To Alia Bhatt-Kapoor)

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एप्रिलमध्ये लग्न केले आणि जूनच्या अखेरीस त्यांनी आपण आईबाबा होणार असल्याचे जाहिर केले. लग्नानंतर इतके दिवस आलियाचे सोशल मीडियावर आलिया भट्ट असेच नाव आहे. पण आता लग्नानंतर ४ महिन्यांनी तिने आपल्या नावापुढे कपूर आडनाव जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मीडियाशी बोलताना तिने सांगितले, मी खूप खुश आहे. आणि आता मी कपूर कुटुंबाचाच एक भाग आहे त्यामुळे मी हे आडनाव माझ्या नावापुढे जोडणार.

पासपोर्टमध्ये नाव अपडेट करण्याबाबत आलिया म्हणाली की, लग्नानंतर मला लगेचच नाव बदलायचे होते, परंतु माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि परदेशी सहलींमुळे वेळ मिळाला नाही. आलियाने आपल्या हॉलिवूड पदार्पणाचा प्रोजेक्ट हार्ट ऑफ स्टोनसाठी जवळजवळ एक महिना यूकेमध्ये घालवला. त्यामुळे ती खूपच व्यस्त होती. पण आता ती अधिकृतरित्या आपले नाव आलिया भट्ट-कपूर करणार आहे. कारण ती लवकरच आई होणार आहे.

रणबीरने आधीच आपले पासपोर्ट अपडेट करुन तिथे विवाहित असा बदल केला आहे. यावर आलिया म्हणाली की,  आता आमचे बाळ येणार आहे. त्यामुळे आता मला भट्ट बनून राहायचे नाही. बाळाचे आडनाव कपूरच असेल. मी त्याच्या नावापुढे भट्ट असे नाही लिहू शकत. आता आम्ही कपूर परिवार एकत्र प्रवास करत आहोत, मी कपूर कुटुंबाचाच एक भाग आहे. तुम्हाला समजतयं ना मला काय म्हणायच आहे.. मला एकटेपणा भोगायचा नाही.

आलियाने हे देखील स्पष्ट केले की, तिचे स्क्रीन नेम नेहमीच भट्ट राहिल. आणि मी पण कायम भट्टच राहिन. पण कागदपत्रांवर नाव बदलणे गरजेचे असल्यामुळे ते बदलले जाईल. आलियाने अजूनही सोशल मीडियावरचे नाव बदलले नाही. ते आलिया भट्ट असेच आहे. आणि तिला तेच नाव ठेवायचे आहे.

रणबीर आणि आलिया त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि आता दोघेही त्यांच्या चित्रपटासोबतच आपल्या मुलाचे स्वागत करण्याच्या तयारीत आहेत.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम