अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर म्हणते की तिचा ...

अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर म्हणते की तिचा करवा चौथवर विश्वास नाही (‘I Don’t Really Agree With The Spirit It Comes From’ Rhea Kapoor Says No To Karwa Chauth Collabs)

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया कपूरचं काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड करण बुलानीसोबत लग्न झालं. रियाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. दरम्यान, आता रिया कपूरने करवा चौथ साजरा करण्यास नकार दिला आहे. तसेच करवा चौथ संबंधित कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करण्यावर मी विश्वास ठेवत नाही, असे तिने स्पष्ट केले आहे.

रिया कपूरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली आहे. “मला मोठ्या सन्मानाने एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की करवा चौथच्या निमित्ताने मला कोणतीही भेटवस्तू पाठवू नका. तसेच या उत्सवासाठी माझ्याकडे येऊ नका. मी या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. आम्ही दोघेही हा उत्सव साजरा करणाऱ्या जोडप्यांच्या भावनांचा आदर करतो. पण माझा या सर्व गोष्टींवर विश्वास नाही. त्यामुळे या अशा गोष्टींचा प्रचार तसेच जाहिरात करण्याचे काम मी आयुष्यात कधीही करणार नाही,” असे रियाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

लग्नानंतरचे हे रियाचे पहिले व्रत असल्याने सर्व लोक रियाला हे व्रत ठेवण्यास सांगत आहेत. म्हणूनच रियाने ही पोस्ट टाकली आहे.    

रिया आणि करणने १४ ऑगस्टला लग्न केले. रिया आणि करण १२ वर्षापासून एकमेकांना ओळखत आहे. या उभयतांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाला अगदी मोजक्या पाहुण्यांनी उपस्थित दर्शवली.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम