‘मी जे सिनेमात करतो, ते प्रत्यक्ष जीवनात ...

‘मी जे सिनेमात करतो, ते प्रत्यक्ष जीवनात कधीच करू शकत नाही’ – अमिताभ बच्चनची कबुली (‘I Can’t Perform The Reel Life Role In Real Life’ – Confessions Of Amitabh Bachchan)

लोकप्रियतेचे शहेनशहा, महानायक अमिताभ बच्चन आज ८०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. ते विविधांगी चरित्र भूमिका साकारत असले तरी, ‘ॲन्ग्री यंग मॅन’ ही त्यांची सिनेमातील प्रतिमा सिनेरसिकांच्या हृदयावर कोरली गेली आहे. त्या संदर्भात त्यांनी मागे एकदा अशी कबुली दिली होती.

Confessions Of Amitabh Bachchan
Confessions Of Amitabh Bachchan

“पडद्यावर मला तुम्ही कितीतरी अशक्य गोष्टी करताना पाहिलं असेल. वीस जणांना मारताना, धावताना किंवा काही भन्नाट करताना, जे प्रत्यक्ष जीवनात मी कधीच करू शकत नाही. काही वर्षापूर्वी मी एका मोठ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलो होतो. शेजारच्या गाडीतल्या माणसानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही जरा जाऊन दोन लाथा हाणा, मग बघा वाहतूक कोंडी कशी सुटेल. अशा प्रकारच्या प्रतिमा लोकांच्या मनात बसलेल्या असतात. त्या बदलणं गरजेचं असतं. सिनेमात मी जो नाही तसाच दाखवत आलो. ‘केबीसी’ मध्ये मात्र मी जो आहे, तोच दिसतो, हा फरक आहे. मी जसा बोलतो, व्यवहार करतो, तसाच इथं देशासमोर दिसतो.”

सौजन्य : लोकसत्ता