शत्रुघ्न सिन्हा म्हणतो, ‘मी नशीबवान आहे, ...

शत्रुघ्न सिन्हा म्हणतो, ‘मी नशीबवान आहे, माझी मुलं ड्रग्ज घेत नाहीत… ‘(I Am Glad Luv-Kush, Sonakshi Don’t Have Such Habits, My Kids Don’t Do Drugs, Says Shatrughan Sinha On Aryan Khan’s Case)

आधी अभिनेता आणि आता नेता असलेले शत्रुघ्न सिन्हा अगदी मोकळेपणाने आणि स्पष्टपणे आपले मत मांडताना दिसतात. अलीकडेच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपले मत मांडताना स्वतःच्या मुलांचे कौतुक केले आणि त्यांच्या संगोपनाबद्दलही ते बोलले. त्याचवेळी आर्यन खान प्रकरणाबाबतही आर्यन हा निमित्तमात्र होता, खरं लक्ष्य तर वेगळंच होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. आर्यन ड्रग्ज प्रकरणी त्यांनी कायम शाहरुखचे समर्थन केले असून खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी हे सर्व घडल्याचे म्हटले आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न म्हणाले की, ते खूप भाग्यवान आहे की लव-कुश आणि सोनाक्षी या त्यांच्या मुलांनी कधीही ड्रग्स घेतले नाहीत. त्यांचे पालनपोषण चांगले झाले असल्यामुळे त्यांना कधीही ड्रग्सचे व्यसन लागले नाही.

आपल्या व्यस्त जीवनशैलीतून मुलांसाठी वेळ काढणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे स्टार्ससाठी एक आव्हान असते का? असे विचारल्यावर त्यांनी सांगितले होते की, आव्हान असते की नाही माहीत नाही, परंतु मुलांसाठी वेळ काढलाच पाहिजे. सुरुवातीपासूनच मी जे बोलतो, ते मी आचरणातही आणतो. म्हणजे मी तंबाखूविरोधी मोहीम करतो. त्यामुळे मी ड्रग्ज आणि तंबाखूला कायम नाही म्हणतो.

शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या मुलांचा अभिमान वाटतो. त्यांचा त्यांच्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. मुलांकडे लक्ष देणे, मुले एकटी पडणार नाहीत याची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे, असे ते म्हणतात. मुलांनी चुकीच्या संगतीत पडू नये, यासाठी पालकांनी त्यांच्यासोबत किमान एक वेळ जेवावे, असे त्यांना वाटते.

आर्यन खान प्रकरणी आर्यनला न्याय मिळायला हवा असंच त्यांना वाटत होतं, केवळ तो शाहरुखचा मुलगा आहे, म्हणून त्याला टार्गेटही करू नये तसेच त्याला कोणतीही विशेष सुविधाही देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. ही शाहरुखची लढाई आहे, त्याला स्वत:लाच लढावी लागणार आहे, कारण या इंडस्ट्रीत सर्वजण एकमेकांना मदत करायला घाबरतात.