मी लोकांच्या सेक्स लाइफबद्दल जाणून घेण्यास खूप ...

मी लोकांच्या सेक्स लाइफबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक आहे, करणने सांगितली त्याच्या मनातली गोष्ट(I am curious to know about people’s sex life- Karan Johar opens up on Why he ask questions on sex life in Koffee With Karan)

करण जोहरचा कॉफी विथ करण हा खूप लोकप्रिय शो आहे. त्याच्या आताच्या नवीन सीझनला देखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सेलिब्रिटींच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारल्यामुळे करणला ट्रोल करण्यात येत आहे. लोकांनी तर हा चॅट शो आहे की सेक्स शो असे म्हटले आहे. करण जोहरने बरेच दिवस या ट्रोल्सवर मौन पाळले होते, पण आता त्याने यावर मौन सोडले असून त्याला कलाकारांकडून त्यांचे बेडरूमचे सिक्रेट का जाणून घ्यायचे असते ते सांगितले.

करण जोहरच्या शोमधील प्रत्येक एपिसोडमध्ये सेक्सबद्दल चर्चा होते. शोमध्ये आलेले सर्व पाहुणे, मग ते विवाहित असोत की अविवाहित, करण जोहर त्यांना त्यांच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारतो. करणने आलिया भट्ट, रणवीर सिंग, सारा अली खान, जान्हवी कपूर, विजय देवरकोंडा, समंथा रुथ प्रभू आणि करीना यांच्यासारख्या जवळपास प्रत्येक सेलिब्रिटींसोबत त्यांच्या बेडरूम सिक्रेटबद्दल गप्पा मारल्या आहेत. यामुळे करण सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतो. आता या शोचा सातवा सीझन संपला असून, करणने सेक्स प्रश्नांबाबतचे सत्य सांगितले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत करण म्हणाला की, मला जे आवडते तेच मला करायचे असते. मला कॉफी विथ करणमधून आनंद मिळतो. मला या शो संबंधित अनेक प्रतिक्रिया देखील मिळाल्या आहेत. त्यात “करण आलियाबद्दल इतके का बोलतो? तो लोकांच्या लैंगिक जीवनावर प्रश्न का विचारतो.”

बेडरुम सिक्रेटच्या प्रश्नांबद्दल करणने सांगितले की, “कदाचित मला लोकांच्या लैंगिक जीवनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल, म्हणून मी त्यांना असे प्रश्न विचारतो. मला आलियाचा खूप अभिमान आहे. कदाचित म्हणूनच माझ्याकडून बोलताना तिचा अनेकदा उल्लेख केला जातो. पण हा फक्त टॉक शो आहे हे लोकांना का समजत नाही. हा केवळ एक मजेदार टॉक शो आहे.”

करणच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा आलिया आणि रणवीर या कलाकारांसोबतचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.