हृतिक रोशनची घटस्फोटित बायको सुझान एका नटाच्या ...

हृतिक रोशनची घटस्फोटित बायको सुझान एका नटाच्या प्रेमात पडली आहे, हे ऐकून चाहत्यांनी घेतलं तिच्यावर तोंडसुख (Hritik Roshan’s Fans Trolled His Ex Wife Sussanne For Relationship With Arslan Goni)

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची (Hritik Roshan) घटस्फोटित बायको (Ex Wife) सुझान खानने (Sussanne) अलीकडेच सोशल मीडियावर पोस्ट टाकून तिचे अर्सलान गोनी (Arslan Goni) या नटासोबत असलेले नाते खुलेपणाने जाहीर केले. अर्सलान गोनीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे. परंतु हृतिकच्या चाहत्यांना मात्र सुझान आणि अर्सलानचं नातं फारसं रुचलेलं नाही. त्यांनी सुझानवर चांगलंच तोंडसुख घेतलेलं आहे.

Sussanne

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

Sussanne

मागच्या आठवड्यात सुझानने अर्सलानसाठी वाढदिवसाच्या दिवशी एक फोटो शेअर केला होता, त्यासोबत तिने पोस्टही लिहिली होती, त्यात तिनं म्हटलं होतं – ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुझ्यासाठी एका अशा जगाची आशा करते की तिथे सर्व काही असो ज्यासाठी तू पात्र आहेस. तुझ्या आजूबाजूला प्रसन्न वातावरण, हसरे चेहरे आणि फक्त प्रेम असू दे. मला भेटलेली सर्वात सुंदर व्यक्ती तू आहेस.’ अर्सलानने सुझानची ही पोस्ट स्वतःच्या इंस्टा स्टोरीवर शेअर करून या पोस्टवर हार्टचे इमोजी पाठवून ‘लव्ह यू’ अशी कमेंट केली होती.

Sussanne

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

सुझानची ही पोस्ट व्हायरल झाली अन्‌ लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोकांनी सोशल मीडियावर अर्सलानला नमुना आणि छपरी म्हटले आहे. तर अर्सलानसारख्या व्यक्तीसाठी हृतिकला का सोडले असा जाबही त्यांनी सुझानला विचारला आहे.

Sussanne

हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाला होता, त्यावेळेस युजर्सनी हृतिकला बेवफा असं म्हटलं होतं. त्यानंतर २०१७ साली एका मुलाखतीमध्ये हृतिकनं म्हटलं होतं की, नेहमी घटस्फोटासाठी पुरुषास कारणीभूत ठरवलं जातं. परंतु ही अतिशय कमकुवत विचारसरणी आहे. त्याने असंही म्हटलं होतं की, कदाचित तो सुपरस्टार असल्याने, तो चुक करू शकतो अशी सामान्यांची विचारसरणी असू शकते. परंतु असं काही नाही आहे. खरं तर दोघांच्या घटस्फोटाला सात वर्षं झाली असूनही त्यांच्यातील मैत्री कायम आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

हृतिक आणि सुझानने लग्न केलं त्यावेळेस त्यांची जोडी ही बॉलिवूडमधील अतिशय रोमँटिक जोडी मानली गेली होती. परंतु २०१४ साली दोघांनी घटस्फोट घेतला. त्यावेळेस त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. या दोघांना दोन मुलगे आहेत. आपल्या मुलांसोबत आजही ही दोघं एकत्र वेळ घालवताना दिसतात. घटस्फोटानंतर बरीच वर्षं सुझान एकटी राहिली परंतु आता अर्सलान गोलीशी आपलं सुत जुळल्याचं तिनं मान्य केलं आहे आणि त्यामुळेच तिला लोकांचा रोष ओढवून घ्यावा लागला आहे.