हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझानचे नवे प्रेमप...

हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझानचे नवे प्रेमपात्र : करतेय् या अभिनेत्याशी डेटिंग (Hritik Roshan’s Ex-Wife Sussanne Khan Fall’s in Love Once Again : She Is Dating With This Actor)

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि त्याची पूर्व पत्नी सुझान खान (Sussanne Khan) यांचा घटस्फोट होऊन ७ वर्षं झाली. दरम्यान त्यांच्यात नवरा-बायको असं नातं नसलं तरी त्यांच्यातील मैत्रीचं नातं टिकून होतं आणि सुझानचं हृतिकच्या घरी बऱ्यापैकी येणंजाणं होतं. आता मात्र इतक्या वर्षांनंतर सुझानच्या आयुष्यात दुसरी प्रेमाची व्यक्ती आली असल्याचे म्हटले जात आहे. तसं पाहिलं तर मीडियावर सुझान आणि अर्सलान गोनी यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा फार आधीपासूनच केली जात होती. परंतु आता सुझानने अर्सलानसोबतच्या तिच्या नात्याला पुष्टी दिली आहे.

Sussanne Khan

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

सुझान खानने सोशल मीडियावर अर्सलान गोनीसाठी वाढदिवसाची एक खास पोस्ट लिहिली आहे. अभिनेता अर्सलान गोनीचा ९ डिसेंबरला वाढदिवस होता आणि सुझान खानने हा प्रसंग खास बनवण्याची एकही संधी सोडली नाही. सुझानने अर्सलानला डेट करत असल्याचं लपवून ठेवलं असलं तरी आता दोघांचं एकमेकांवरचं प्रेम समोर आलं आहे. त्याची एक झलक अर्सलानच्या बर्थडे पार्टीत पाहायला मिळाली.

Sussanne Khan

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

सुझानने अर्सलानसाठी वाढदिवसाची पार्टीदेखील दिली होती, ज्यात जवळचे मित्र- मैत्रिणी उपस्थित होते. मुश्ताक शेखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वाढदिवसाच्या पार्टीचा एक व्हिडिओ शेअर केला. यात अर्सलान केक कापताना दिसत आहे. सुझान आणि शेजारी उभे असलेले इतर मित्र टाळ्या वाजवत आहेत. व्हिडिओमध्ये सुझान अर्सलानच्या गळ्यात हात घालून फिरताना दिसत आहे. तिने अर्सलानला केकही भरवला.

त्याचवेळी, सुझानने अर्सलानसाठी वाढदिवसाच्या दिवशी एक खास पोस्टही लिहिली, त्यात तिनं म्हटलंय – ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुझ्यासाठी एका अशा जगाची आशा करते की तिथे सर्व काही असो ज्यासाठी तू पात्र आहेस. तुझ्या आजूबाजूला प्रसन्न वातावरण, हसरे चेहरे आणि फक्त प्रेम असू दे. मला भेटलेली सर्वात सुंदर व्यक्ती तू आहेस.’

अर्सलानने सुझानची ही पोस्ट स्वतःच्या इंस्टा स्टोरीवर शेअर करून या पोस्टवर हार्टचे इमोजी पाठवून ‘लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे. या आधी अर्सलानने देखील सुझानच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला इन्स्टाग्रामवर विश केले होते. त्यानेही तिच्यासाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले होते की, तो यापूर्वी इतक्या चांगल्या मनाच्या व्यक्तीला कधीच भेटला नव्हता. सुझान आणि अर्सलान एकमेकांची एवढी प्रशंसा करताहेत यावरून आग दोनो तरफ एकजैसी है, असं म्हणावयास हरकत नाही.

Sussanne Khan
Sussanne Khan

दोघांनी यापूर्वी आपल्यातील नात्यासंबंधी कधी खुलेपणाने हमी दिली नसली तरी अर्सलानने एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की, ते दोघे त्यांच्या एका कॉमन मित्राच्या घरी एकमेकांना भेटले होते. तेव्हा त्यांची ट्यूनिंग जूळली अन्‌ ते चांगले मित्र बनले आणि आता त्यांची मैत्री प्रेमात बदलली असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम