हृतिक रोशनची बायको सुझान खानचे उघडकीस आलेले प्र...

हृतिक रोशनची बायको सुझान खानचे उघडकीस आलेले प्रेमप्रकरण (Hrithik Roshan’s Ex-Wife Sussane Khan Is In Love Again, She is Dating Aly Goni’s Brother)

हृतिक रोशन आणि त्याची बायको सुझान खान यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला त्याला बरीच वर्षे झालीत. पण त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. दोघेही चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते आपल्या दोन्ही मुलांचे पालनपोषण व्यवस्थित करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात तर सुझान हृतिकच्या घरीच राहिली होती. हे पाहता दोघेही पुन्हा एकत्र येतील, असे वाटले होते.

पण आता अशी माहिती मिळाली की, सुझानने एका देखण्या पुरुषाशी जवळीक साधली आहे. ती त्याच्या प्रेमात पडली आहे. ‘बिग बॉझ १४’ चा स्पर्धक अली गोनी याचा लहान भाऊ अर्सलान गोनी याच्याशी तिचे प्रेमप्रकरण जोरात चालू आहे.

मीडिया रिपोर्टस्‌ अनुसार सुझान आणि अर्सलान घनिष्ट मित्र आहेत. दोघे एकमेकांना गेल्या ६ महिन्यांपासून ओळखतात. एकमेकांच्या सहवासात ते बराच वेळ घालवतात. टी. व्ही. क्षेत्रातील कॉमन मित्रांच्या संगतीतून या दोघांची ओळख झाली. अन्‌ त्यांची जवळीक वाढली.

आपल्या या मित्रांसोबत अर्सलान व सुझान हिंडताना दिसतात. २०१७ मध्ये या अर्सलानने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. सुझान ही सुप्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे.

एकदा लग्न मोडलं असल्याने सुझान सावधपणे संबंध ठेवते आहे. सुझान व अर्सलानने आपल्या संबंधांवर अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही.

सुझान-हृतिकचे लग्न २००० साली झाले होते. २०१४ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. हृतिकचे विवाहबाह्य संबंध हे दोघांच्या घटस्फोटाचे कारण सांगितले जाते. तरीपण मुलांसाठी हे दोघेही एकमेकांची सोबत राखून आहेत. इतकंच नव्हे तर, हृतिक रोशनच्या बऱ्यावाईट प्रसंगात सुझानने त्याची पाठराखण केली आहे.


कंगनाचे भयंकर वादग्रस्त ट्वीट : म्हणते – टॉयलेट स्वच्छ केले नाही तर गांधीजी आपल्या पत्नीला घराबाहेर काढत