खूपच मादक आणि सुंदर आहे ह्रतिक रोशनची बहिण पश्म...

खूपच मादक आणि सुंदर आहे ह्रतिक रोशनची बहिण पश्मिना, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण (Hrithik Roshan’s Cousin Pashmina Roshan Is Very Glamourous, She Is All Set To Make Her Bollywood Debut)

हिंदी इंडस्ट्रीत रोशन फॅमिली ही सतत चर्चेत असते. कधी ह्रतिक रोशनमुळे, त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या एक्स वाईफमुळे किंवा त्याच्या गर्लफ्रेंडमुळे. पण यावेळी रोशन फॅमिलीमधलं आणखी एकजण चर्चेत आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे पश्मिना रोशन. पश्मिनाच्या सौंदर्याच्या चर्चा आतापासूनच सगळीकडे होताना पाहायला मिळतात. रोशन फॅमिलीची ही लाडकी कन्या लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चला तर मग जाणून घेऊ कोण आहे पश्मिना रोशन आणि रोशन फॅमिलीसोबत तिचे काय नाते आहे.

पश्मिना ही सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी आणि ह्रतिक रोशनची चुलत बहीण आहे. सध्या ती तिच्या बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत आहे. शाहीद कपूर आणि अमृता राव यांचा डेब्यू चित्रपट इश्क-विश्कचा सिक्वेल असणारा ‘इश्क विश्क रिबाउंड’ मधून पश्मिना तिच्या करियरची सुरुवात करणार आहे.

काही दिवसांपूर्वीच पश्मिनाने तिच्या बॉलिवूड पदार्पणाची घोषणा केली. तिने तिच्या चित्रपटाचा टीझर शेअर करत लिहिले की,”असं वाटतंय की माझी वर्षांची मेहनत आता फळाला येईल. मी माझा पहिला स्क्रीन एक्सपीरियंस शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आणि नर्वस आहे. जेव्हा आपल्याला आपले रिलेशनशिप अॅप्सवर शोधता येते आणि एका चॅटमध्ये हरवताही येते तर तुम्हाला माहित आहे की, प्रेमाला आता अपग्रेड होण्याची गरज आहे. इश्क विश्क रिबाउंड. आता वेळ आहे पुढे जाण्याची.”

पश्मिनाने नादीरा बब्बर यांच्या अॅक्टिंग क्लासमध्ये आणि बॅरी जॉन इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे ट्रेनिंग घेतले आहे. तिने इंग्लिश नाटकांतसुद्धा काम केले आहे. याव्यतिरिक्त ती तिचा भाऊ ह्रतिक रोशनकडून अभिनयासंदर्भात काही धडे घेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोवर्स आहेत.

पश्मिना त्यांच्या कुटुंबात सगळ्यांचीच लाडकी असून ह्रतिकसोबतसुद्धा तिचा खास बॉण्ड दिसून येतो. ह्रतिक अनेकदा पश्मिनासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

सौंदर्य आणि ग्लॅमरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास पश्मिना भविष्यात बॉलिवूड स्टार किड्स सारा अली खान, अनन्या पांडे आणि जाह्नवी कपूरला नक्कीच टक्कर देईल.