मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या साखरपुड्य...

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या साखरपुड्याला ऋतिक रोशनने गर्लफ्रेंडसोबत लावली हजेरी (Hrithik Roshan Twins In White With Girlfriend Saba Azad As He Attends marathi actress bhagyashree mote’s Engagement Party)

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. मध्यंतरी अभिनेता लवकरच आपली गर्लफ्रेंड सबा आझादसोबत लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. सबा देखील अनेकदा हृतिकसोबतच दिसते.

काल संध्याकाळी हे जोडपे पुन्हा एकदा एकत्र दिसले होते. ऋतिकने आपला मेकअप आर्टिस्ट विजय पालांडे आणि मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या एंगेजमेंट पार्टीला हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्यासोबत सबा सुद्धा होती. दोघांनी एकमेकांना मॅचिंग असे पांढऱ्या रंगाचे पोशाख घातले होते. पार्टीत हे जोडपे खूप सुंदर दिसत होते.

ऋतिक आणि सबाने पापाराझींसाठी भरपूर पोज दिल्या. त्यावेळी ऋतिकने पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता आणि सबाने लूज बॉटम आणि शूजसह डीप नेक व्हाइट क्रॉप टॉप घातला होता. ती खूप साधी आणि छान दिसत होती.

यानंतर या दोघांनी विजय पालांडे आणि भाग्यश्रीसोबत फोटोसाठी पोज दिल्या. साबा आणि ऋतिक याआधीही अली फैसल आणि रिचा चढ्ढा यांच्या रिसेप्शनला एकत्र पोहोचले होते.

ऋतिकचा विक्रम वेधा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून तो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. यानंतर ऋतिक फायटरमध्येही दिसणार आहे. सबा बद्दल बोलायचे तर तिचा म्युझिक बँड आहे.