ऋतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आजादसोबतचा फोटो शेअर...

ऋतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आजादसोबतचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी केले ट्रोल (Hrithik Roshan Trolled For Sharing Photo With Girlfriend Saba Azad Ridiculed For Age)

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनचा विक्रम वेधा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अभिनेता चर्चेत आहे. याशिवाय सध्या तो आपल्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत आहे. अलीकडेच ऋतिक रोशनने आपल्या इंस्टाग्रामवर गर्लफ्रेंड सबा आझादचा एक फोटो शेअर केला. यानंतर सोशल मीडिया युजर्सने अभिनेत्याला त्याच्या वयावरुन वाईट पद्धतीने ट्रोल करण्यास सुरुवात केली.

गर्लफ्रेंड सबा आझादसोबतच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असलेल्या ऋतिक रोशनने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. हा फोटो त्यांच्या लंडनच्या सहलीचा आहे. या फोटोत सबा बाकड्यावर बसली असून ऋतिक दोघांचे सेल्फी काढत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच तो वेगात व्हायरल झाला. ऋतिकच्या चाहत्यांनी त्या फोटोवर कमेंट करायला सुरुवात केली. अभिनेत्याला गर्लफ्रेंड सबा आणि त्याच्या वयासाठी ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

चित्रपट निर्माता करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांनी आपले नाते जगजाहीर केले.

युजर्स  फोटोवर कमेंट करत आहेत, तसंच ऋतिक आणि सबाला प्रश्न विचारत आहेत. एका सोशल मीडिया युजरने कमेंटमध्ये लिहिले, ‘हे वडील आणि मुलगी एकत्र काय करत आहेत? तर दुसरीकडे दुसऱ्या युजरने ‘ही तर याच्या मुलीच्या वयाची आहे’ अशी कमेंट लिहिली. सबाला भूक लागली आहे, कोणीतरी तिला खायला द्या, असे काही युजर कमेंटमध्ये म्हणत आहेत.

ऋतिकच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांचा २०१४ ला घटस्फोट झाला. ऋतिक  सध्या सबाला डेट करत आहे. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकताच ऋतिक ‘विक्रम वेधा’मध्ये दिसला होता. ‘फायटर’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण दिसणार आहे.