ऋतिक रोशन नोव्हेंबर महिन्यात करणार प्रेयसी सबा ...

ऋतिक रोशन नोव्हेंबर महिन्यात करणार प्रेयसी सबा आजादसोबत दुसरे लग्न, ट्विट होत आहे व्हायरल (Hrithik Roshan To Marry Girlfriend Saba Azad In November 2023, Viral Tweet Claims)

सोशल मीडियावर एक ट्विट व्हायरल होत आहे. हे ट्विट वाचून असं वाटतंय की हृतिक रोशन लवकरच आपल्या कथित गर्लफ्रेंडसोबतच्या नात्याला नवीन नाव देणार आहे. व्हायरल ट्विटवरून हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत नोव्हेंबरमध्ये लग्न करण्याचा विचार करत असल्याचे बोलले जाते.

हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा सार्वजनिकरित्या एकमेकांचे हात पकडून चुंबन घेताना दिसत आहे. पण दोघांनीही आपल्या नात्याबद्दल अधिकृतरित्या काहीही सांगितले नाही.

नुकतेच सोशल मीडियावर एक ट्विट व्हायरल होत आहे. हे व्हायरल ट्विट @BollywoodKiNews नावाच्या ट्विटर हँडलवरून केले गेले आहे. या व्हायरल ट्विटनुसार, हृतिक रोशन आणि सबा आझाद आपले नाते पुढे नेण्याचा विचार करत आहेत. व्हायरल ट्विटमध्ये “ब्रेकिंग न्यूज:- हृतिक आणि सबा आझाद नोव्हेंबर 2023 मध्ये लग्न करणार आहेत!” असे लिहिले आहे.

या बातमीत किती तथ्य आहे हे माहीत नसले तरी हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्याकडून या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पण रोशन कुटुंबाच्या काही व्हायरल फोटोंवरुन हृतिकची मुले आणि कुटुंब तसेच सबाच्या कुटुंबाने दोघांचे नाते आनंदाने आणि मनापासून स्वीकारल्याचे दिसत आहे.