फिटनेसच्या बाबतीत ह्रतिकच्या वरचढ आहेत त्याचे व...

फिटनेसच्या बाबतीत ह्रतिकच्या वरचढ आहेत त्याचे वडील राकेश रोशन, अभिनेत्याने शेअर केला जिममधला व्हिडिओ (Hrithik Roshan Shares Workout Video Of Rakesh Roshan)

फिटनेस प्रिय बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने काही दिवसांपूर्वीच आपले वडील राकेश रोशन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्याच्या वडिलांचा वर्कआउट करतानाचा आहे. हृतिक रोशनने तो व्हिडिओ जिममधून शेअर केला आहे. या वर्कआउट व्हिडिओमध्ये अभिनेत्याने वडिलांचे मनभरुन कौतुक केले आहे. हृतिकने शेअर केलेल्या या जिम व्हिडिओवर फरहान अख्तर आणि आपली माजी पत्नी सुजैन खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जिममध्ये काढलेल्या या व्हिडिओत असे दिसते की, निर्माते राकेश रोशन त्यांच्या प्रशिक्षकाच्या देखरेखीत वेट लिफ्टिंगचा व्यायाम करत आहेत. 2018 मध्ये राकेश रोशन यांना कर्करोगाचे निदान झाले होते. तेव्हापासून ते स्वत:च्या शरीराकडे व आरोग्याकडे विशेष लक्ष देतात. कधी कधी ते स्वत: सुद्धा जिममधला व्यायाम करतानाचा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असतात.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता ह्रतिक रोशनने आपल्या वडिलांच्या फिटनेसबद्दल कॅप्शनमध्ये लिहिले की, माझे वडील माझ्याहीपेक्षा जास्त फिट आहेत, आता काय करायचे बरं!

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता , राकेश रोशन यांनी काळ्या आणि केशरी रंगाचे जिमचे कपडे घातले आहेत. जिममध्ये ते वेट लिफ्टिंगचा व्यायाम करत आहे. तसेच व्हिडिओत राकेश यांचे प्रशिक्षक त्यांना व्यायामासंबंधी काही सूचना देखील देत आहे. या व्हिडिओवर चित्रपट निर्माते फरहान अख्तर यांनी ‘खूप छान’ अशी कमेंट केली तर ह्रतिकची माजी पत्नी सुजैन खानने ‘वाव’ अशी कमेंट केली आहे. तर काही यूजर कमेंटमध्ये lतुम्ही खूप तरुण दिसत आहात असे म्हणत आहेत.

ह्रतिक रोशन लवकरच विक्रम वेधा या तमिळ चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राधिका आपटे दिसणार आहे. 30 सप्टेंबर 2022 ला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.