ह्रतिक रोशन त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत गेला फ...

ह्रतिक रोशन त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत गेला फ्रान्स फिरायला, पहा दोघांचे रोमॅण्टिक फोटो (Hrithik Roshan-Saba Azad Go On Romantic Long Drive In France)

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद यांच्या रोमान्सच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून हृतिक आणि सबाबद्दल सोशल मीडियावर बोलले जात होते.  या दोघांना अनेकदा हातात हात घालून फिरताना पाहिले गेले आहे. एवढेच नाही तर हृतिक आणि सबा सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत कौतुक करत असतात.

काही दिवसांपूर्वी ह्रतिक आणि साबा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्याला फिरायला गेले होते. आता ते फ्रान्समध्ये एकत्र वेळ घालवत आहेत.

ह्रतिक रोशनची कथित गर्लफ्रेंड सबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत ती ह्रतिक रोशनसोबत लॉंग ड्राइव्हचा आनंद घेत होती. तिचा तो व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला.

तो व्हिडिओ पाहून अनेकांना जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाची आठवण झाली. व्हिडिओत सबा ओपन बोनेट कारमध्ये बसली आहे. तर ह्रतिक ड्रायव्हिंग सीटवर बसल्यासारखे वाटते. कारण या व्हिडिओत ह्रतिकचा चेहरा दिसलेला नाही. सबाच्या बोटात काळ्या रंगाची एक अंगठी दिसत आहे. त्या व्हिडिओत फ्रान्समधील निसर्गाचे सुंदर दृष्य दिसत आहे.

गजबजलेल्या शहरातून शांतता अनुभवण्यासाठी हे कपल लॉंग ड्राइव्हला गेल्यासारखे वाटते. सबाने व्हिडिओत ह्रतिकचा चेहरा दाखवला नसला तरी काही दिवसांपूर्वी तिने एक सुंदर फोटो पोस्ट केला होता व तो फोटो ह्रतिक रोशनने काढल्याचे तिने कॅप्शनमध्ये म्हटले होते. त्यावरुन ते दोघे एकत्रच असल्याचा अंदाज युजर्स बांधत आहेत.