रितिक रोशनने केला दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक स...

रितिक रोशनने केला दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक सोबत धमाकेदार डान्स (Hrithik Roshan Performs Garba With Dandiya Queen Falguni Pathak, Fans Say- ‘Falguni Is Dancing Better Than Hrithik’)

नवरात्रीत साक्षात दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक समोर जर गाणी गात असेल तर त्यावर थिरकण्याचा मोह आवरणे कठिण असते. मग तिथे सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा एखादा सुपरस्टार.

सध्या सोशल मीडियावर फाल्गुनी पाठकच्या गरब्यामधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत खुद्द रितिक रोशनला फाल्गुनीच्या गाण्यावर गरबा करण्याचा मोह आवरता न आल्याचे पाहायला मिळते.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत रितिक गरबा करताना दिसत आहे. तर फाल्गुनी रितिकच्या ‘एक पल का जीना’ गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे.

 फाल्गुनी रितिकपेक्षा छान डान्स करत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. एका यूजरने असेही लिहिले की, रितिकला गरबा करता येत नाही, त्यामुळे फाल्गुनीने विचार केला की, मीच रितिकचे स्टेप्स आणि डान्स करते.

स्टेजवर दोघांची जुगलबंदी खूपच छान होती. रितिकही मोठ्या उत्साहात नाचत होता आणि त्याला समोर पाहून चाहते दंग झाले होते. तर दांडिया क्वीन आपले हिट गाणे गाऊन त्यावर नाचत होती.