रिलेशनशिपमध्ये हृतिक-सबाचं पुढचं पाऊल, सबासोबत ...

रिलेशनशिपमध्ये हृतिक-सबाचं पुढचं पाऊल, सबासोबत लिव्ह इन मध्ये राहणार हृतिक (Hrithik Roshan and Saba Azad to move in together soon in mannat)

अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांविषयी प्रेम जाहीर करताना दिसतात. इतकंच नव्हे तर विविध कार्यक्रमांमध्येही त्यांनी एकत्र हजेरी लावली आहे. सबा आणि हृतिकला अनेकदा एकत्र व्हेकेशनवरही जाताना पाहिलं गेलं आहे. आपल्या नात्याबद्दल हे दोघं मोकळेपणे व्यक्त होत असतानाच आता हृतिकने त्यांच्या रिलेशनशिपमध्ये पुढचं पाऊल उचलण्याचा मोठा निर्णय घेतल्याचं कळतंय. हृतिक आणि सबा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार आहेत.

हृतिक आणि सबानं मुंबईत एका आलिशान इमारतीत घर घेतलंय जिथे दोघं एकत्र राहणार आहेत. एका वेबसाईटच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, हृतिक रोशनच्या जवळच्या सूत्रानं सांगितलं की काही दिवसांपासून एकत्र राहण्याचा विचार हृतिक आणि सबा करत होते. दोघं मुंबईतील ‘मन्नत’ नावाच्या आलिशान इमारतीत एकत्र राहणार आहेत. या इमारतीतील वरचे मजले हे नव्याने बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हृतिक आणि सबा लवकरच तिथे राहण्यासाठी जाणार आहेत.

हृतिकने याआधी त्याच्या दोन घरांसाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च केले आहेत. जुहू-वर्सोवा लिंक रोडजवळ ही दोन घरं आहेत. आता सबासोबत राहण्यासाठी त्याने ३० कोटी रुपये खर्च केल्याचं कळतंय. जुहू-वर्सोवा लिंक रोडवर ही आलिशान इमारत आहे. सी-व्ह्यू असलेली ही अपार्टमेंट ३८ हजार स्क्वेअर फीटमध्ये पसरलेली आहे.

हृतिक आणि सुझान खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय. हृतिक सबाला डेट करत असतानाच सुझान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. हृतिक आणि सुझानला हृदान आणि रेहान ही दोन मुलं आहेत. विशेष म्हणजे सबा आणि सुझान यांच्याचही चांगली मैत्री झाली आहे.

हृतिक आणि सबाच्या वयात जवळपास 17 वर्षांचं अंतर आहे. हृतिकच्या कुटुंबीयांशीही सबाची जवळीक वाढली आहे. त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून तिने जेवण केलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचं म्हटलं जातं. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.

हृतिक रोशनच्या सिनेमाविषयी बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘विक्रम वेधा’ रिलीज झाला होता. सिनेमात त्याच्यासोबत सैफ अली खान, राधिका आपटे, रोहित सराफ असे कलाकार होते. तर नुकतेच त्याच्या ‘फायटर’ सिनेमाचं शूटिंगही सुरू झालं आहे. या ॲक्शन थ्रीलर सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पादूकोण आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे.