हृतिक रोशन आणि सबा आझाद दोघांची ट्विटरवर भेट झा...

हृतिक रोशन आणि सबा आझाद दोघांची ट्विटरवर भेट झाली… आणि अशी सुरू झाली त्यांची प्रेमकहाणी (Hrithik Roshan and Saba Azad met on Twitter, Know everything about their love story)

सध्या सगळीकडे हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आहेत. त्यातच एकदा हृतिक आणि सबा एकमेकांचा हात धरून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. आत्तापर्यंत हृतिक आणि सबा एकत्र दिसत होते मात्र नुकतंच ती हृतिकच्या कुटुंबीयांसोबतही दिसली. सबा, हृतिक आणि हृतिकच्या कुटुंबाने एकत्र जेवण केलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे चित्र पाहता रोशन कुटुंबानेही सबा आझाद आणि हृतिक रोशन यांच्यातील नात्याला मान्यता दिल्याचे स्पष्ट होते. पण तुम्हाला माहिती आहे का हृतिक रोशन आणि सबा आझाद यांची पहिली भेट कुठे झाली आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली?

 याआधी दोघांची भेट डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाल्याची चर्चा होती. पण या दोघांची भेट डेटिंग अॅपवर नव्हे तर ट्विटरवर झाली असल्याची माहिती आहे. इथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि त्यानंतर दोघांनाही प्रेमाची अनुभूती आली असे वाटते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही आपली मैत्री साजरी करण्यासाठी गोव्याच्या सुट्टीवर गेले होते. हृतिक किंवा सबा या दोघांनीही त्यांच्यामधील नात्याविषयी कोणतेही भाष्य केले नसले तरी रिपोर्ट्सनुसार, दोघेही बी-टाऊनचे लेटेस्ट लव्हबर्ड्स आहेत, जे अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात.

गेल्या २-३ महिन्यांपासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे कळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हृतिकने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हीडिओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले होते आणि मग पर्सनल मेसेजेस सुरू झाले असल्याची माहिती आहे. आधी ते मित्र बनले, नंतर एकमेकांवर प्रेम करू लागले. आता दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत.

सबा स्वतः एक चांगली गायिका आणि अभिनेत्री देखील आहे आणि यासोबत ती एका बँडचाही भाग आहे. २००८ मध्ये ‘दिल कबड्डी’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर ती २०११ मध्ये ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात दिसली. याशिवाय ती अजूनही अनेक वेब आणि बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. तिची ‘रॉकेट बॉईज’ ही वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे.

हृतिकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक रोशन लवकरच ‘विक्रम वेधा’ आणि ‘फायटर’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हृतिकच्या आधी सबा नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाहसोबत २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जातं.

हृतिकची पूर्व पत्नी सुझैन खानलाही सबा आवडते, काही दिवसांपूर्वी सुझैनने सबाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.