रणबीर कपूर रामासाठी व हृतिक रोशन रावणाच्या भूमि...

रणबीर कपूर रामासाठी व हृतिक रोशन रावणाच्या भूमिकेसाठी यांनी केली थक्क करणारी, कित्येक कोटी रुपयांची मागणी (Hrithik-Ranbir Will Take So Many Crores To Play Ram And Ravana In New ‘Ramayana’)

‘रामायण’ सारख्या पौराणिक कथेची अनेक प्रसारणं आपण आत्तापर्यंत पाहिली आहेत, परंतु आता नव्याने येणारे ‘रामायण’ अधिक मनोरंजक असणार आहे. चित्रसृष्टीतील सुपरिचीत निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक नितेश तिवारी नव्या रामायणाच्या तयारीला लागले आहेत. त्यांच्या या रामायणाचा डंगा अनेक वर्षे इंडस्ट्रीत वाजत राहील असं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे हे प्रोजेक्ट पूर्णपणे तयार झालं आहे. परंतु यामधील राम आणि रावण यांच्या मुख्य भूमिकांवरून वातावरण काहीसे तप्त झाले आहे. या भूमिकांसाठी रणबीर कपूर आणि हृतिक रोशन यांची वर्णी लागणार असल्याचे कळते.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

नितेश तिवारींचं या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचे बजेट ऐकून तुम्ही चकीत व्हाल. असं म्हणतात की, ‘रामायण’ एक वेब सिरिज असणार आहे, जिचे बजेट जवळपास ७५० कोटीपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही वेब सिरिज मधू मंटेना प्रोड्यूस करणार आहेत. परंतु अजूनही या सिरिजच्या बजेटबाबत अधिकृत घोषणा केली गेली नाहीये.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रामायणामध्ये रणबीर कपूर आणि हृतिक रोशन, राम आणि रावणाचे पात्र साकारणार आहेत. एवढेच नाही तर उभयता या भूमिकेसाठी प्रत्येकी ७५ -७५ कोटी रुपये घेत असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी त्यांनी कोणत्याही प्रोजेक्टसाठी एवढी मोठी रक्कम घेतली नसावी.  

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

बातमीनुसार, नितेश तिवारीचे हे ‘रामायण’ इतरांपेक्षा वेगळे असणार आहे. आत्तापर्यंत जे दाखवले गेले नाही असे, ‘रामायण’चे  वेगळे रूप यात दाखवले जाणार आहे. त्याचबरोबर सीतेच्या पात्राबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती नाही. जरी काही काळापूर्वी असे म्हटले जात होते की अभिनेत्री करीना कपूर खान सोबत चर्चा सुरू आहे, परंतु सूत्रांनी ती पूर्णपणे नाकारली आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

नितेश तिवारीचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये तो काहीही कमी पडू देऊ इच्छित नाही. अशा स्थितीत या वेब सीरिजमध्ये दोन सुपरस्टार एकत्र असल्याने लोकांचा उत्साह अनेक पटींनी वाढणार आहे.