गर्भारपणात कांजिण्या झाल्या तर…? (How To Treet ...

गर्भारपणात कांजिण्या झाल्या तर…? (How To Treet Chicken Pox If Affected In Pregnancy?)


माझी मुलगी 9 वर्षांची आहे. तिला मासिक पाळी सुरू झाली आहे. सामान्यतः मासिक पाळी 11-12 वर्षांपासून सुरू होते. एवढ्या लहान वयात पाळी सुरू झाल्याने तिच्या आरोग्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब तर नाही ना?

 • स्वाती, देवगड

 • आजकालचे राहणीमान पाहता मुलींची मासिक पाळी लवकर सुरू होत आहे. त्यात चिंता करण्याचे कारण नाही. परंतु तुमच्या मुलीला स्वच्छतेने व जबाबदारीने सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याचे शिक्षण देणे जरूरी आहे. स्त्री म्हणून सुरक्षित राहण्याचेही शिक्षण देणे गरजेचे आहे. पाळी लवकर आल्यामुळे उंची कमी वाढण्याची शक्यता असते. यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने काही औषधोपचार करता येतात. तसेच उंची वाढण्याचे व्यायाम करून उदा. दोरीच्या उड्या, सायकलींग इत्यादीने उंची जास्त वाढवण्याचा प्रयत्न करता येतो.
 • माझ्या मैत्रिणीचे 6 महिन्यांपूर्वी लग्न झाले. ती आता बाळाचा विचार करत आहे. तत्पूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांनी तिच्या रक्त तपासण्या केल्यावर कांजिण्यावरची लस घेण्याचा सल्ला तिला दिलेला आहे. याचे कारण काय असावे अन् ती घ्यावी का?
 • मधुरा, नाशिक
  जी स्त्री गर्भारपणात पदार्पण करू इच्छिते तिचे आरोग्य उत्तम असावे. आई होण्यापूर्वी तिने निरोगी असणे गरजेचे असते. गर्भारपणात जर कांजिण्या झाल्या तर गर्भार स्त्रीच्या आरोग्यास व कधी कधी जीवासही धोका निर्माण होऊ शकतो. बाळातही व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते. जर गर्भार स्त्रीमध्ये कांजिण्याच्या विषाणूविरोधी रोगप्रतिकारकशक्ती असेल तर तिला कांजिण्या होण्याचा धोका कमी होतो. यासाठी रक्त तपासणी करून रोगप्रतिकारकशक्तीची पातळी बघता येते. जर रोगप्रतिकारकशक्ती नसेल तर त्यासाठी गर्भारपणा अगोदर लस घेता येते. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर दीड दोन महिन्यानंतर गर्भारपणासाठी प्रयत्न करता येतात.
 • माझ्या भाचीचे लग्न होऊन 3 महिने झाले आहेत. तिला आता बाळ हवे आहे. परंतु, एक समस्या निर्माण झाली आहे. योनीमार्ग अरुंद असल्यामुळे तिला अडचण येत आहे. तिच्या या समस्येवर काही तोडगा आहे का? काय करावे?
 • मानसी, मुंबई
  तुम्ही तुमच्या समस्येसाठी स्त्री रोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. योनीमार्ग रूंद करण्यासाठी डायलेटर्स मिळतात, ते वापरावेत. त्याने नक्की
  फायदा होईल.