होळीच्या रंगात आपली त्वचा व केस कसे जपाल? (How ...

होळीच्या रंगात आपली त्वचा व केस कसे जपाल? (How To Take Care Of Your Skin And Hair While Playing With Colors In Holi)

रंगांचा सण होळी जवळ आला आहे. गेली दोन वर्षं कोविडच्या भीतीने आपल्याला रंग खेळता आले नव्हते. यंदा सर्वजण होळी उत्साहाने साजरी करण्यास उत्सुक आहेत. रंग खेळताना आपली त्वचा व केसांची काळजी कशी घ्यावी, याबाबत वोक्हार्ट हॉस्पिटलच्या कन्सल्टंट प्लास्टीक व रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. श्रद्धा देशपांडे यांनी दिलेल्या ८ टिप्स.

१. होळीच्या आधी त्वचेचे कोणतेही उपचार टाळा – जसे वॅक्सिंग, ब्लीचिंग, फेशियल, पील्स, लेसर. या प्रक्रियेनंतर त्वचा असुरक्षित असते आणि कठोर रंग त्वचेला हानी पोहोचवू शकतात.

२. रंग खेळण्यापूर्वी तुमच्या त्वचेला आणि केसांना तेल लावा. नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेल एक संरक्षणात्मक अडथळा बनवते आणि त्वचेचे संरक्षण करते. तसेच ते डाग पडण्यापासून प्रतिबंधित करते आणि रंग सहजपणे धुण्यास मदत करते.

३. शक्यतो सेंद्रिय आणि नैसर्गिक रंग वापरा. होळी खेळताना सिंथेटिक आणि गडद रंगांचा वापर टाळा.

४. घराबाहेर खेळताना एसपीएफ ४० प्लस सह सनस्क्रीन वापरा, शक्यतो ते वॉटरप्रूफ असावे.

५. तुमच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी सैल लांब बाही असलेले शर्ट किंवा कपडे घाला. डेनिम टाळा. ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू नका.

६. तुमचे केस उघडे ठेवू नका. केस झाकून ठेवा किंवा पोनीटेल घाला.

७. कडक सूर्यप्रकाशात खेळताना स्वतःला हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात तुमची त्वचा ताजी आणि निरोगी ठेवण्यासाठी, होळीच्या दिवशी मिठाई आणि थंडाई खा, तसेच ताजी फळे आणि सॅलडचे सेवन करा.

८. होळी खेळल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा आणि सौम्य साबण वापरा आणि केसांना सौम्य शॅम्पूने धुवा. तसेच कंडिशनर वापरण्यास विसरू नका. जास्त जोमाने स्क्रब करणे टाळा कारण त्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते.