मानसिक आरोग्य कसे सांभाळाल? (How To Take Care O...

मानसिक आरोग्य कसे सांभाळाल? (How To Take Care Of Mental Health)

आज कोविड १९ची साथ मावळताना दिसत असली तरी, ती पूर्णपणे गेलेली नाही. त्यामुळेच या काळात शारीरिक आरोग्याबरोबरच काही लोकांचे मानसिक आरोग्य बिघडलेले दिसत आहे. परंतु त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. त्या निमित्ताने मानसिक आरोग्य कसे सांभाळावे याबाबत फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर, रुचिका वर्मा यांनी दिलेल्या मोलाच्या टिप्स्‌ – 

तुम्ही एकटे नाही

मानसिक आरोग्याच्या समस्या भेदभाव करत नाहीत. म्हणजेच कोणतीही सामाजिक – आर्थिक परिस्थिती, भौगोलिकता किंवा लिंग असले, तरी मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. भारतात मानसिक आरोग्याशी संबंधित दुर्लक्षित समस्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. ही आव्हाने कोविड-१९ महामारीमुळे आणखी तीव्र झाली आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आणि केवळ मानसिक आजार आहे म्हणून तुम्ही स्वतःला एकटे ठेवता कामा नये.

लक्षणांवर नजर ठेवा –इतर कोणतीही ठळक लक्षणे असलेल्या, सहज मोजमाप करता येण्यासारख्या, रक्ताची चाचणी किंवा स्कॅनच्या मदतीने निदान करता येणाऱ्या शारीरिक समस्यांप्रमाणे मानसिक आरोग्याच्या 

समस्या इतक्या सोप्या नसतात. असे असले, तरी माहितगार व्यक्तीला काही लक्षणे वारंवार दिसल्यास मदतीची आवश्यकता असल्याचे लक्षात येऊ शकते. वेगवेगळ्या मानसिक आजारांची लक्षणेवेगळी असली, तरी त्यातील सर्वात महत्त्वाच्या लक्षणांमध्ये खूप जास्त काळजी करणे किंवा भीती वाटणे, खूप निराश किंवा दुःखी वाटणे, गोंधळ होणे आणि मूडमध्ये वारंवार बदल होणे यांचा समावेश होतो.

गरज असेल तेव्हा व्यावसायिक सल्ला घ्या 

ज्याप्रमाणे मधुमेह किंवा हृदयाच्या आजारावर तुम्ही स्वतः घरीच उपचार करणार नाही, त्याचप्रमाणे मानसिक आजारावर उपचार करतानाही ‘डु इट युअरसेल्फ’(डीआयवाय) असा दृष्टीकोन ठेवू नये. त्याऐवजी मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हाने हाताळण्यासाठी व्यावसायिक मदत आणि गरजेप्रमाणे औषधे घ्यावीत.

खर्चाची काळजी करू नका, कारण विमा योजनेमध्ये मानसिक आराजाचे खर्च कव्हर होतात. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्याची गरज लक्षात घेत इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने (IRDAI) ऑगस्ट 2018 मध्ये विमा कंपन्यांना मानसिक आजाराकडेही इतर कोणत्याही आजाराप्रमाणे पाहाण्याचे आणि आरोग्य विमा योजनेअंतर्गत मानसिक आजार कव्हर करणे बंधनकारक केले. बहुतेक आरोग्य विमा कंपन्या मानसिक आजारासाठी हॉस्पिटलायझेशन कव्हर करतात, मात्र थोड्याच कंपन्या मानसोपचारतज्ज्ञांसारख्या मानसिक आरोग्य सल्लागारांचे ओपीडी उपचार कव्हर करतात. तेव्हा आता तुम्हाला मानसिक आरोग्याचे उपचार करताना त्याच्या खर्चाची काळजी करण्याची गरज नाही.

हे कायमस्वरुपी नसते 

लक्षात ठेवण्याजोगी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बहुतेक वेळेस मानसिक आजार कायमस्वरुपी नसतो. तेव्हा त्यासोबत जगण्याऐवजी त्यावर उपचार करण्याला प्राधान्य द्या. तुमचे मानसिक आरोग्य बदलू शकते हे लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.