पत्नीचे दुसर्या कुणाशी संबंध असतील का? (How To ...

पत्नीचे दुसर्या कुणाशी संबंध असतील का? (How To Tackle Suspicious Behavior Of Wife?)

आम्ही पती-पत्नीने वयाची चाळिशी ओलांडली आहे. लग्न झाल्यापासून आम्ही नियमितपणे, चांगल्या प्रकारे सेक्स करत आलो आहोत. परंतु, अलीकडे माझ्या असं लक्षात आलं आहेत की, माझी पत्नी सेक्स संबंध झाले की, लगेच तोंड फिरवून गाढ झोपी जाते. पूर्वी आम्ही थोडे फार चाळे करत होतो. पण आता तिला यात रस दिसून येत नाही. माझ्या पत्नीचं अन्य कुणाशी संबंध तर आले नसतील ना? अशी मला शंका येत आहे. यावर काय उपाय करता येईल?

सर्वसाधारणपणे ही तक्रार बायका, आपल्या नवर्‍याच्या संदर्भात करताना आढळतात. परंतु, इथे नवर्‍याने बायकोबाबत तक्रार केली आहे. तेव्हा अविनाशभाऊ, माझा आपल्याला असा सल्ला आहे की, एवढ्या पटकन निष्कर्षावर पोहोचू नका. आपल्या पत्नीवर असा संशय घेऊ नका. कदाचित त्यांना दिवसभर जास्त काम पडत असेल आणि त्या थकून जात असतील. म्हणून सेक्स केल्यावर लगेच झोपण्याची त्यांना गरज भासत असेल. तेव्हा त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा. आपल्या पूर्वीच्या दिवसांची, वर्तणुकीची त्यांना आठवण करून द्या. प्रश्‍न सुटेल. विनाकारण संशय घेणं योग्य नाही.

आमच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत. परंतु, मला अजून गर्भधारणा झालेली नाही. आम्हा दोघांनाही लवकर मूल हवं आहे. त्यासाठी किती वेळा समागम केला पाहिजे, असं काही शास्त्र आहे का? किंवा नेमकं काय करावं म्हणजे मला हमखास दिवस जातील. कृपया सुचवावं.

लैंगिक सुख जास्त घेता यावं, म्हणून कित्येक नवविवाहित जोडप्यांचा कुटुंब नियोजन करण्याकडे कल असतो. परंतु, तुम्हा दोघांनाही मूल लवकर हवं आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, त्यासाठी किती वेळा समागम केला पाहिजे, याचं काही शास्त्र नाही. कधी कधी पहिल्या समागमातच गर्भधारणा होऊ शकते. लैंगिक सुख आवडी-निवडीनुसार तुम्ही किती वेळाही घेऊ शकता. मात्र हमखास दिवस जाण्यासाठी विशिष्ट काळात समागम केला, तर हे चान्सेस वाढतील. मासिक पाळी आल्यानंतर 10 ते 16 या दिवसादरम्यान समागम करा.

माझं वय 20 वर्षांचं आहे. मला स्त्री शरीराचं आकर्षण निर्माण झालं आहे. मला त्याबद्दल स्वप्न पडतात. अनेक मुलींशी सेक्स करत असतानाची स्वप्न मी पाहतो. प्रत्यक्षात मी स्वभावाने लाजाळू आहे. भेटलेल्या मुलीशी बोलण्याचीही माझ्यात हिंमत नाही. माझी परिस्थिती कशी सुधारेल?

तरुण वयात स्त्री देहाचं आकर्षण वाटणं, हे स्वाभाविक आहे. त्याविषयी चिंता करण्याचं कारण नाही. मात्र अनेक मुलींशी सेक्स करत असल्याची स्वप्नं एकसारखी पडत असतील आणि त्यामुळे तुमची झोप किंवा दिनचर्या बिघडत असेल, तर मात्र निग्रहाने मनात येणारे हे विचार झटकून टाका. आधी विचार मनात येतात आणि नंतरच त्याची स्वप्नं पडतात. याचा उपयोग झाला नाही, तर चांगल्या लैंगिक समस्या आणि संमोहन उपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.