नवरा सतत सलगी करतो… (How To Tackle Over R...

नवरा सतत सलगी करतो… (How To Tackle Over Romantic Husband?)

आमच्या लग्नाला 3 वर्षे झाली आहेत. आम्हाला मुलगा झाला आहे. तो 1 वर्षाचा आहे. माझ्या बाळंतपणानंतर पतीची सेक्सची क्रेझ वाढली आहे. ते सतत माझ्या भोवती घोटाळत असतात. ऑफिसातून घरी आले की, बेडरूममध्ये बोलावतात अन् तिथेच राहायला सांगतात. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. घरात सासू-सासरे, दीर-नणंद सगळेच असतात. तेव्हा संध्याकाळी असे बेडरूममध्ये अडकून राहणे मला प्रशस्त वाटत नाही. मला अतिशय लाज वाटते. घरातल्या लोकांसमोर तोंड दाखविणे नको वाटते. स्वयंपाकासाठी मी बाहेर आले तरी हे माझ्या मागे किचनमध्ये येतात. माझ्याशी बोलण्याच्या बहाण्याने मला मागे स्पर्श करतात. मला हे नको वाटते. कारण घरातल्या माणसांनी पाहिले, तर काय, या भीतीपोटी माझा जीव खालीवर होत असतो. मिस्टरांची समजूत कशी घालू?
तुमच्या पतीला तुमचे आकर्षण वाटते, ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी तुम्हाला बेडरूममध्ये अडकवून ठेवणे किंवा तुमच्या भोवती घोटाळत राहणे, ही त्यांची प्रेम प्रदर्शनाची पद्धत असेल. हे सारं नैसर्गिक आहे. मात्र निव्वळ सेक्सच्या हव्यासापोटी जर ते सतत सलगी करू पाहत असतील, तर ते व्यवहार्य नाही. यामध्ये गैर काही नाही, हे लक्षात घ्या. पण घरात माणसे जास्त असल्याने तुम्हाला संकोच वाटतो. कोण काय म्हणेल याची भीती वाटते. म्हणून तुम्हाला समस्या आहे. अशा सेक्सी नवर्‍याची समजूत घालणे, म्हणजे त्यांना तुमच्या मनः स्थितीची कल्पना देणे अगत्याचे आहे. तेव्हा तुमची होणारी कुचंबणा त्यांच्या लक्षात आणून द्या. इतःपर त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तर आपण वेगळे राहूया, वेगळ्या घरात राहूया, अशी सूचना करा. ते घरच्या लोकांपासून अलग राहू शकत नसतील, तर तुमची सूचना त्यांना पटणार नाही. अन् त्यांच्यात सुधारणा होऊ शकेल.


मी व माझे पती, दोघेही वयाच्या चाळीशीमध्ये आहोत. पूर्वीपेक्षा आमच्यात सेक्स करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण अधूनमधून करतोच. परंतु आजकाल माझे पती मोबाईल फोनमध्ये पोर्नोग्राफी व्हिडिओ पाहत असतात. मित्रांनी पाठविले असे सांगतात. हे पोर्नो व्हिडिओ ते एन्जॉय करतात. शिवाय सेक्स करण्यापूर्वी पाहतात किंवा ते बघत बघत सेक्स करतात. मला हे आवडत नाही. कारण मोबाईलमधील सर्वच अश्‍लील व्हिडिओ चांगले नसतात. ते पाहू नका, असं सांगितलं तर ऐकत नाहीत. मजा वाटते, तूही पाहा, असे म्हणतात. पण मला ते बघवत नाहीत. असे पोर्नो चित्रपट पाहणे योग्य आहे का? त्यांचे हे वेड बंद करण्याचा काही इलाज आहे का?
पोर्नो व्हिडिओ पाहण्यात गैर काही नाही. ते पाहण्यात आनंद मिळवणारे बरेच लोक आहेत. ते थांबवताही येणार नाहीत. कारण ते इंटरनेटद्वारे सहज उपलब्ध आहेत. तुम्हा दोघांचे वय पाहता व तुमचे पती सेक्स करताना ते व्हिडिओ पाहतात; यावरून त्यांच्यामध्ये कमजोरी आली असावी. त्यामुळे उत्तेजना येण्यासाठी ते अशा व्हिडिओची मदत घेत असणार. त्यातही गैर काही नाही. तुमच्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या विवाहित स्त्रीपुरुषा मध्ये उत्तेजना येण्यासाठी असे व्हिडिओ मदतगार ठरतात. मात्र त्यांच्या आहारी जाऊन त्याशिवाय सेक्स करण्यात जर तुमचे पती अपयशी ठरत असतील, तर चांगल्या लैंगिक समस्या तज्ज्ञांची किंवा संमोहन तज्ज्ञांची मदत घ्या. म्हणजे तुमच्या पतीचे हे वेड थांबेल..