वेल्थ वासमुळे पैशांची आवक वाढवा (How To Raise M...

वेल्थ वासमुळे पैशांची आवक वाढवा (How To Raise Money With The Help Of Wealth Vase?)

आपली संपत्ती, सुबत्ता कायम राहावी, त्यात वाढ व्हावी म्हणून तिजोरीत वा घरात काय बदल करावे?
– अवंतिका, डहाणू
घरातील उत्तर दिशा ही पाणी तत्त्वाची दिशा असून धन संपत्तीशी संबंधित दिशा आहे, तिला अधिकाधिक ऊर्जित करावे. घरातील तिजोरीचे तोंड उत्तरेला ठेवावे. शिवाय त्या संपत्तीची वाढ होण्यासाठी व ती कायम राहण्यासाठी वेल्थ वास (Wealth Vase) ठेवावे. पैशांची आवक वाढते.

कोणत्याही क्षेत्रातील यश हे आपल्या मेहनतीवर अवलंबून असतं, हे खरं आहे. पण त्यात वास्तूचा देखील काही सहभाग असतो का? त्यामुळे काय परिणाम होतो?
– सुमन, मुलुंड
अर्थात् वास्तूचा परिणाम प्रत्येक गोष्टीत होतो. पंचतत्त्वांची मांडणी, दिशा योग्य असल्यास शुभ उर्जेचा प्रवाह वाढतो. ही शुभ ऊर्जा घेऊन आपण जेव्हा काम-धंद्यासाठी बाहेर पडतो, सोबत आपली मेहनत व आत्मविश्वास असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्ती होते.

वास्तुशास्त्रानुसार दुसर्‍या व्यक्तीची वस्तू वापरणे नुकसानदायक असते का?
– उषा, सोलापूर
प्रत्येकजण नेहमी हाताळत असणार्‍या प्रत्येक वस्तूमध्ये त्या त्या व्यक्तीची मानसिकता ऊर्जेच्या रुपात (शुभ-अशुभ) प्रवाहित असते. त्यामुळे दुसर्‍याच्या वस्तू वापरताना, त्या काही वेळेला उपयुक्त तर काही वेळेला हानिकारक ठरू शकतात. म्हणून योग्य ती काळजी घ्यावी.


मला फुलझाडांची आवड आहे. अगदी इनडोर प्लांटस् देखील लावायला मला आवडतात. ती ठेवताना कोणत्या विशिष्ट दिशेला ठेवावी का?
– किशोरी, रत्नागिरी
पूर्व दिशा ही लाकूड तत्त्वाची दिशा असल्यामुळे या दिशेला तुम्ही झाडे ठेवू शकता. आग्नेय दिशा सुद्धा झाड ठेवण्यासाठी योग्य आहे. पण लक्षात ठेवा बोनसाई (वाढ अनैसर्गिकरित्या कुंठवलेली) झाडे घरात किंवा आजूबाजूला लावू नयेत.