काँटॅक्ट लेन्स आणि आय मेकअप (How To Match Eye M...

काँटॅक्ट लेन्स आणि आय मेकअप (How To Match Eye Make UP With Contact Lens)

सण-समारंभाच्या वेळी चष्म्यापेक्षा काँटॅक्ट लेन्सेसनाच बहुतांश स्त्रिया पसंती देतात. बरं केवळ चष्म्याला पर्याय म्हणून नाही, तर मेकअपचाच एक भाग म्हणूनही हल्ली अनेक स्त्रिया विविध रंगाच्या काँटॅक्ट लेन्सेस आवर्जून वापरतात. काँटॅक्ट लेन्सेसमुळे डोळे अधिक आकर्षक दिसतात, यात शंकाच नाही. मात्र काँटॅक्ट लेन्स वापरणार असाल, तर डोळ्यांचा मेकअप करताना विशेष काळजी घ्यायला हवी. अन्यथा डोळ्यांना त्रास होऊ शकतो आणि मेकअपही बिघडू शकतो.

– काँटॅक्ट लेन्स लावण्यापूर्वी सौम्य हँड वॉशने हात धुऊन, स्वच्छ टॉवेलने पुसून कोरडे करून घ्या. विशेष सावधगिरी बाळगून काँटॅक्ट लेन्स लावा, नाहीतर डोळे जळजळणं इत्यादी त्रास होऊ शकतो.
– डोळ्यांचा मेकअप करण्यापूर्वी काँटॅक्ट लेन्स लावा. मेकअप केल्यानंतर काँटॅक्ट लेन्स लावताना लहानशी चूक झाली, तरी आय मेकअप पूर्णतः बिघडू शकतो.
– काँटॅक्ट लेन्स लावल्यानंतर आय मेकअप करताना, सर्वप्रथम आयशॅडो लावा. पापण्यांवर हलक्या हाताने आयशॅडो लावा.
– त्यानंतर आय लायनर लावा.

– सर्वांत शेवटी मस्कारा लावून कम्प्लिट लुक द्या.
– डोळ्यांच्या आतील बाजूस काहीही लावू नका. बर्‍याच स्त्रिया काजळ डोळ्यांच्या आतील बाजूनेही लावतात. यामुळे डोळे जळजळण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तेव्हा काजळ लावायचंच असेल, तर ते बाहेरच्या बाजूने लावा.
– मेकअप काढताना, सर्व प्रथम काँटॅक्ट लेन्स काढा, त्यानंतर मेकअप काढा.
– हलक्या हाताने कॉटन बॉलचा वापर करून मेकअप काढा.
काँटॅक्ट लेन्सेस लावल्यानंतर आय मेकअप करताना आणि मेकअप काढतानाही विशेष काळजी घ्या. घाई मुळीच करू नका.