स्लिम दिसा (How to look Slim)

स्लिम दिसा (How to look Slim)

स्लिम दिसणं हे आजच्या पिढीतील एक फॅड झालं आहे. त्यासाठी स्लिम असणंही जरुरीचं नाही. आपल्या केशभूषेपासून ते वेशभूषेपर्यंत हजारो पर्याय आहेत की ज्यांच्या मदतीने आपण काहीही कष्ट न घेता अगदी चवळीच्या शेंगेप्रमाणे बारीक दिसू शकतो. पंचविशीनंतर मुली मोठ्या होत नाहीत, अर्थात मोठ्या होऊ इच्छित नाहीत. म्हणजे त्या स्वतःला कायम पंचविशीतल्याच ठेवू इच्छितात. कुठल्याही वयात स्वतःला ताजंतवानं, सुंदर, तरुण, एनर्जीक ठेवणं वा त्यासाठी प्रयत्न करणं खरंच कौतुकास्पद आहे. परंतु काही वेळा जलद जीवनशैलीमुळे मनात असूनही
स्वतःकडे लक्ष देण्यास पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही. खाणं-पिणं-झोपणं इत्यादीच्या वेळा पाळणं कठीण जातं. आणि मग वजन कधी वाढतं तेही कळत नाही. बरेचदा स्थूलपणा असणार्‍या व्यक्तींना उगीचच स्लिम मुलींचा हेवा वाटतो. परंतु आता तसं वाटण्याचं काहीच कारण नाही, कारण काही स्मार्ट युक्त्यांनी आपणही स्लिम दिसू शकता.


कपड्यांचं फिटींग आणि लेंथ
– आपला जाडेपणा लपविण्यासाठी आपल्या साइजपेक्षा मोठे कपडे वापरू नयेत. कपड्यांच्या फिटींगकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे.
– अ‍ॅन्कल लेन्थ किंवा त्यापेक्षा थोडी लांब ब्लॅक, नेव्ही ब्लू जीन्स किंवा ट्राउजर घाला. त्यासोबत स्लिम फिट शर्ट, टेलर्ड ब्लेजर किंवा जॅकेट घाला.
– गुडघ्यापर्यंत लांब पेन्सिल स्कर्ट वा ए लाइन स्कर्टही स्मार्ट ऑप्शन आहे.
– कॅप्री, लाँग बॅगी शॉर्टस्, शॉर्ट टॉप, खूप घट्ट ड्रेस, शेपलेस हाफ लेंथ स्कर्ट घालण्याचे टाळा.
– खूप सैल कपडेही घालू नका त्यामुळे जाडेपणा मुद्दाम दिसण्यात येतो.
– तुमचे दंड मोठे असतील तर तुम्ही थ्री-फोर्थ, फुल हाताचे कपडे घाला. चांगले दिसतात.
– आपले पाय जास्त जाड दिसत असतील तर शॉर्ट ड्रेससोबत डार्क रंगाचे स्टॉकिंग्ज् वापरा.

पारंपारिक वस्त्रं परिधान करावयाची असल्यास
– सणासुदीला वा लग्न समारंभ वगैरे सांस्कृतिक कार्यक्रमांस जाताना जॉर्जेट, शिफॉन सारख्या मऊ आणि गडद रंगाच्या साड्या नेसून जा.
– जर लोअर बॉडी जड असेल तर बॉडीला एकसारखा लूक देण्यासाठी शोल्डर पॅडचा वापर करून पाहा.
– एम्पायर लाइन, कळीदार कुर्तादेखील लोअर बॉडीस कव्हर करण्यास मदत करतात. हे घालून बघा.
– इंडो-वेस्टर्न आऊटफिटस् घालण्याची इच्छा असेल तर शिफॉन, जॉर्जेट यासारख्या कपड्यांपासून बनविलेले पारंपरिक गाऊन, अनारकली, ट्युनिक इत्यादी वापरू शकता.
– शिफॉन, जॉर्जेटचे प्लेन स्कर्ट, सोबत कॉर्सेट घाला. कॉर्सेटने आपल्या बॉडीचा परफेक्ट शेप कळतो.
– जर स्तन मोठे असतील तर आपल्याला खाली गळे असलेले (लो नेक) कपडे अधिक छान दिसतील. ब्रा ची निवडही विचारपूर्वक करावी. बाजारात मिनिमायजर ब्रा उपलब्ध असतात त्यांचा वापर करू शकता.


रंगांची निवड कशी कराल?
जाडेपणा लपविण्यासाठी रंग आपली मदत करतात. जर तुम्ही आपल्या पेहरावाप्रमाणे रंगांची निवड केली तर सहज बारीक दिसाल.
– काळा, तपकिरी, हिरवा, निळा यांसारखे गडद रंगांचे पेहराव करा.
– स्थूल महिलांना जर लाइट कलरचे कपडे घालावयाचे असल्यास त्यांनी पिच कलरसारखे रंग वापरून त्याला गडद रंगांची लेस लावावी.
– प्रिंटेड कपडे वा दोन रंगातील कपडे शक्यतो वापरू नका.
– प्रिंटेड कपडे वापरण्याची आवड असेल तर त्यांनी छोटी प्रिंट असलेले वा उभ्या स्ट्रिप्सचे, चेक्सचे कपडे घालावे.

जीन्स कशी निवडावी?
– जर तुमची कंबर आणि मांड्या मोठ्या असतील तर तुम्हाला टू मिड वेस्ट जीन्स चांगली आहे. यामुळे तुमचं सुटलेलं पोटही दिसणार नाही.
– जर तुमचे पाय जाड आहेत तर तुम्ही बूट-कट जीन्स ट्राय करा. ही जीन्स वरून घट्ट आणि खाली रुंद (सैल) असते. स्थूलपणामुळे जर तुम्ही स्कीनी जीन्स घालू शकत नसाल तर स्ट्रेट लेग जीन्स वापरा. ही जीन्स वापरण्यास सोयीस्कर आहे.
– पोट सुटलेलं आहे तर लो-वेस्ट जीन्स वापरा.


शेप वेअर घाला आणि परफेक्ट शेप मिळवा
परफेक्ट बॉडी शेप मिळविण्याकरिता शेप वेअर्स वापरा. कॉर्सेट, वेस्ट बँड, मिनिमायजर ब्रा, लो-लेग निकर, हाय वेस्ट बँड निकर इत्यादी शेप वेअर्सचा वापर करून तुम्ही तुमचा स्थूलपणा सहजपणे लपवू शकता.


दागिन्यांची निवड
कपड्यांच्या निवडीबरोबरच त्यासोबत घालण्यात येणारे दागिनेही आपल्याला स्लिमर लुक देत असतात.
– चेहरा गोल असेल तर लांब लटकणारे कानातले आणि लांब नेकलेस घालावेत.
– टॉप्स किंवा लहान कानातले घालू नका.
– स्थूल व्यक्तींनी छोट्या दागिन्यांची निवड करू नका.
– मान लांब असल्यास गळ्याबरोबरचे दागिने घालू नयेत.


चपला
– आपल्या त्वचेच्या रंगाला मॅच करणार्‍या चपला निवडाव्यात.
– जाड टाचाच्या चपला घालण्याऐवजी पेन्सिल हिलच्या सँडल वापरा.
– बुटस् वापरू नका.