मनमुराद भिजा पण मेकअप जपा (How To Look After yo...

मनमुराद भिजा पण मेकअप जपा (How To Look After your Make Up while Getting Wet In Rains)

पावसाळ्यातील कुंद हवेत चेहर्‍यावरील सुंदर रंग प्रकर्षाने जाणवतात. हे सौंदर्य खुलविण्यासाठी आपण मेकअप करतो. पण पावसात मनमुराद भिजताना मेकअप बिघडू नये म्हणून काही मेकअप रूल्स अजमावायला हवेत.
पाऊस म्हटलं की, भिजण्याचा जितका आनंद होतो तितकीच स्वतःला जपण्याची धास्ती वाटते. चेहर्‍यावर ओघळणार्‍या पाण्याने मेकअपची पूर्ण वाट लागेल, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. रोजच्या मेकअपला काट न देता त्यात थोडीशी कल्पकता दाखवून केलेला मेकअप तुम्हाला सुंदर बनवतो आणि जास्त काळ टिकतोही. पावसाळी ऋतूत मेकअप कसा करावा, हे जाणून घ्यायलाच हवं. म्हणूनच या काही टिप्स ज्या तुमच्या मेकअपला वेगळा टच देतील.
पावसाळ्यातील मेकअपची सर्वात महत्त्वाची अट असते, म्हणजे मेकअपचे साहित्य वॉटरप्रूफ असावे. तरच तो मेकअप पावसात भिजल्याने बिघडत नाही आणि जास्त काळ टिकतो.
या ऋतूत खरं तर मेकअपला काट दिली पाहिजे. पण संपूर्ण मेेकअप करणार नसाल तरीही मस्कारा, आयलाइनर आणि फाउंडेशन वॉटरप्रूफ असावे.
पावसाळ्यात आर्द्रता वाढल्याने संसर्गही लगेच होतो. म्हणूनच मेकअपची उत्पादने चांगल्या दर्जाची व वॉटरबेस असावी.
पावसात थोडेफार तरी भिजले जात असल्याने, या काळात अगदी हेवी मेकअप करू नये. लाइट मेकअप वा शियर मेकअप यासाठी योग्य असतो.

आयशॅडो स्मोकी ब्ल्यू किंवा ग्रे रंगातील असावी.
लिपस्टीकमध्येही लाइट पिंक, पीच अथवा लाइट चॉकलेटी रंगाचा वापर करावा.
त्वचा कोरडी असल्यास एसपीएफयुक्त लाइट टिंटेड मॉइश्चरायझर वापरा. त्यात मॉइश्चरायझर आणि फाउंडेशन या दोन्हीचे गुणधर्म असतात. ज्यांना फारसा मेकअप करणं आवडत नाही, मात्र त्याचा हलका टच द्यायला आवडतो त्यांच्यासाठी हे मॉइश्चरायजर उत्तम पर्याय आहेत.
मेकअपसाठी मॅट कलर्सचा वापर करावा. विशेषतः लिपस्टीक मॅट रंगातीलच वापरावी.
पावसाळ्यात विशेष करून फाउंडेशनचा वापर
टाळा. अन्यथा भिजल्यानंतर चेहर्‍यावर ते ओघळले जाते. फाउंडेशन लावणे आवश्यक असेल तर ते वॉटरप्रूफच असावे.
फेस पावडर वा कॉम्पॅक्टचा वापर संपूर्ण चेहर्‍यावर करू नये. चेहरा भिजल्यास फेस पावडर एका जागी जमून बसते. चेहर्‍याचा तेलकट भाग झाकला जावा म्हणून, केवळ त्याच ठिकाणी फेस पावडर वा कॉम्पॅक्ट लावावे.
मेकअपआधी कन्सिलर लावताना ऑइलबेस्ड असावे. दाट , क्रीमसारखी कन्सीलर्स वापरणं टाळा. ती ओघळण्याची शक्यता असते. त्याऐवजी मॅट कन्सीलरचा वापर करा.
आयशॅडो लावताना स्टीक किंवा पावडर स्वरूपात लावता येते. मात्र क्रिम आयशॅडोचा वापर करू नये. पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे चेहरा चिकट व तेलकट झालेला असतो. क्रिम आयशॅडोमुळे तो अधिक चिकट दिसू शकतो.
फिकट गुलाबी, निळा, नारिंगी हे पावसाळ्यातील मेकअप खुलण्यासाठी योग्य रंग आहेत, तेव्हा मेकअपसाठी याच शेडचा वापर करावा.
या ऋतूत काजळ वा आयलायनर शक्यतो लावू नका. याऐवजी काजळ पेन्सिल लावा किंवा डार्क आयशॅडोने मान्सून लूक द्या.
मस्कारा लावताना त्याचे दोन थर लावा. हा मस्कारा वॉटरप्रूफच असायला हवा. याबरोबरच आयब्रोदेखील डार्क करा.
रोजच्या वापरासाठी ट्रान्सपरंट किंवा क्लिअर मस्कारा अगदी योग्य आहेत. याच्यामुळे डोळ्यांचा आकारही खुलून दिसतो. शक्यतो काळ्या रंगाचा वॉटरप्रुफ मस्कारा लावावा. तसेच मस्कारा लावताना खालच्या बाजूच्या पापण्यांना मस्कारा लावू नका.
लिप मेकअपसाठी जास्त काळ टिकणारी लिपस्टिक योग्य आहे. मात्र पारदर्शक लिपस्टीकचा वापर या काळात करू नये.
ब्राउन वा पिंक शेडमधील लिपग्लॉस यासाठी उत्तम आहेत. मात्र लिक्वीड कलर्सचा वापर करू नये.
ब्लशर लावताना ते लाइट आणि क्रिम स्वरूपातील असावे. हे चेहर्‍यावर व्यवस्थितपणे बसतात. तसेच क्रिम ब्लशर वॉटर बेस असल्याने चेहरा भिजल्यानंतर ते टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसता येतात. क्रिम ब्लशरकरिता ब्राउन वा पीच रंगाचा वापर करा.
कपाळावरील केसांच्या जवळच्या भागात मेकअप करू नका. कारण पावसाने केस लगेच भिजतात आणि तेथील मेकअप खराब होतो.


मान्सून मेकअप कसा असावा
मेकअप करण्यापूर्वी सौम्य फेस वॉशने चेहरा धुवा आणि क्लिन्जरने स्वच्छ करून घ्या.
चेहर्‍यावर 5-10 मिनिटे बर्फाचे तुकडे घासा. यामुळे मेकअप जास्त काळ टिकून राहतो.
यानंतर तुमची त्वचा तेलकट असेल तर अ‍ॅस्ट्रिंजेंट लावा किंवा त्वचा सामान्य वा कोरडी असेल तर
टोनर लावा.
यानंतर फाउंडेशन न लावता कॉम्पॅक्ट पावडर लावा.
डोळ्यांना तुम्हाला सुयोग्य वाटणारी क्रिम आयशॅडो लावा.


आय पेन्सिलने डोळ्यांना रेखीव करून वॉटरप्रूफ मस्काराचे थर लावा.
तुम्हाला आवश्यक वाटल्यास ब्लश करा. हे ब्लश लाइट असावे. याकरिता तुम्ही पीच, पिंक वा लाइट ब्राउन रंग वापरू शकता.
लाइट पिंक वा पीच रंगाची लिपस्टीक आणि लिप लायनर लावा. तसेच लिपग्लॉस लावूनही ओठांना वेगळा लूक प्राप्त होतो.
पावसाळ्यात मेकअप करताना तुम्ही वेगवेगळे लूक
करू शकता.
नॅचरल लूक – पावसाळ्यात सर्वांना आवडणारा असा लूक म्हणजे नैसर्गिक लूक. यासाठी त्वचेला जुळणारे फाउंडेशन त्वचेला लावून त्यावर हलकीशी कॉम्पॅक्ट
पावडर लावावी. डोळ्यांना स्मोकी लूक देऊन ओठांना न्यूट्रल रंगाच्या लिप लायनरने बॉर्डर आखून गडद रंगाची लिपस्टीक लावा.
ब्रॉन्झ लूक – या ऋतूत हा लूकही छान दिसतो. इव्हिनिंग लूकसाठी हा लूक योग्य असून याकरिता ब्रॉन्झ फिनीश असलेले फाउंडेशन लावा. नंतर स्मोकी आय मेकअप करा. आय मेकअपकरिता डार्क ब्राउन किंवा
अ‍ॅक्वा ब्ल्यू रंगाचा वापर करा. शिमरी मेटालिक लूक ग्लॉसने मेकअपला फायनल टच द्या.