पावसाळ्यात असे करा घराचे संरक्षण (How To Keep Y...

पावसाळ्यात असे करा घराचे संरक्षण (How To Keep Your Home Neat And Tidy In Monsoon)

पावसाळा म्हटलं की पाणी गळणं, घराच्या भिंती ओल्या राहणं हे आलंच. हे गृहित धरूनच घराच्या संरक्षणासाठी काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत.

  • पावसाळ्यात घराच्या कोणत्याही खोलीत पाणी गळत असेल, तर ते थांबवण्यासाठी रबराचे लायनिंग वापरा.
  • गळणार्‍या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा व्हाइट सिमेंट लावून पाण्याची गळती बंद करा.
  • पाऊस सुरू होण्यापूर्वी, घराच्या बाहेरील भिंतींवर डॅम्प प्रूफरसह वॉटर प्रूफ पेंट लावा, जेणेकरून बाहेरील भिंतींवर शेवाळ धरणार नाही.
  • फरशी साफ करण्यासाठी फिनाइल वापरा किंवा अ‍ॅन्टीसेप्टिक क्लिनरने फरशी स्वच्छ करा.
  • घराच्या मुख्य दाराजवळ पायपुसणं ठेवा, जेणेकरून पायांना लागलेल्या पाण्याने फरशी खराब होणार नाही.
  • घरातील ओलावा दूर करण्यासाठी, जेव्हा जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा लगेच खिडक्या आणि दरवाजे उघडा. असे केल्याने घराच्या भिंती ओलाव्यापासून वाचतील.
  • मुसळधार पावसामुळे घराच्या भिंती आतून ओल्या झाल्या असतील तर त्या भागावर घराच्या आतून सिल्वर फॉइल लावा.
  • घरात लावलेली झाडे बाहेर नेऊन ठेवा. यामुळे झाडांना नैसर्गिक पाण्याचा पुरवठा होईल आणि घरही मोकळे राहील.
  • या ऋतूमध्ये चप्पल आणि शूज घराच्या आत नाही तर बाहेर ठेवा. यामुळे घरात घाण होणार नाही.
  • घराच्या छतावर कुठेही पाणी साचू देऊ नका.