गणेश चतुर्थी : श्रीगणेशाला प्रसन्न करून आपल्या ...

गणेश चतुर्थी : श्रीगणेशाला प्रसन्न करून आपल्या मनोकामना पूर्ण करा (How To Get Blessings Of Lord Ganesha)

बुद्धीची देवता, विघ्नहर्ता आणि जीवनात सुखसमृद्धी देणाऱ्या श्रीगणेशाची ज्याच्यावर कृपा होते, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन त्यास गणेशाचा आशीर्वाद मिळतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो. तेव्हा गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणेशाला कसं प्रसन्न करावं, गणेशाची पूजा कशी करावी याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती देत ​​आहोत.

अशी करा गणपतीची पूजा

How To Get Blessings Of Lord Ganesha

गणपतीला त्याच्या आवडीचे लाल सिंदूर अर्पण करा. असे केल्याने अडकलेली कामे पार पडतात आणि प्रगती होते.

पूजा करताना गणपतीला दररोज दुर्वा अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होऊन इच्छित वरदान देतात.

गणपतीला लाल फुले अर्पण करणे शुभ मानले जाते, म्हणून पूजेच्या वेळी गणपतीला लाल फुले अर्पण करा.

गणपतीला लाडू आणि मोदक आवडतात, त्याचा नैवेद्यात समावेश करा.

पूजेनंतर गणेशाची आरती करा. असे केल्याने उपासनेचे फळ लवकर प्राप्त होते.

गणेशाला असे करा प्रसन्न

How To Get Blessings Of Lord Ganesha

प्रत्येकाला सुख-सौभाग्य-समृद्धी मिळवायची असते आणि त्यासाठी सर्व लोक प्रयत्नही करतात, पण अनेकदा लाख प्रयत्न करूनही मनोकामना पूर्ण होत नाही. तुमच्याही काही मनोकामना असतील तर या गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, गणेशाला प्रसन्न करून पहा, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. चला, गणेशाला प्रसन्न करण्याचे सोपे मार्ग जाणून घेऊया.

१) गणेशोत्सवाच्या वेळी गणपतीला दररोज तूप आणि गूळ अर्पण करा आणि ते गोमातेला खायला द्या. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

२) दारिद्र्य दूर करण्यासाठी, कमळावर आसनस्थ असलेल्या गणपतीची पूजा करा. तुम्हाला नक्कीच धन मिळेल.

३) विद्यार्थ्यांनी गणपतीला दुर्वा अर्पण करावी, असे केल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडेल.

४) वाईट नजरेपासून वाचण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासाठी, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी, आपल्या घरात पांढऱ्या गणपतीची स्थापना करा आणि दररोज त्याची पूजा करा.

५) जर मुलीच्या लग्नात अडथळा येत असेल तर दररोज गणपतीसमोर रुद्राक्षच्या ११ माळांचा जप करा आणि ‘ओम गण गणपतये नम:’ चा जप करावा. त्यानंतर गणपतीला मोदक अर्पण करा. मग गणपतीसमोर आपल्या इच्छा व्यक्त करा. असे केल्याने लवकरच तुमचे लग्न होईल.

६) तुम्हाला मनासारखे घर खरेदी करायचे असेल तर गणेशोत्सवाच्या वेळी गणपतीसमोर बसून ११ वेळा गणपती स्तोत्राचे पठण करा आणि गणेशाला २१ दुर्वां अर्पण करा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.

७) मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी, गणपतीसमोर लाल आसनावर बसून ‘गणपती अथर्वशीर्ष’ चे ११ वेळा पठण करा आणि गणपतीला लाडू अर्पण करा. नंतर गणपतीसमोर आपल्या इच्छा व्यक्त करा. असे केल्याने तुम्हाला हवी असलेली नोकरी नक्कीच मिळेल.

८) गणपतीला कधीही तुळशी अर्पण करू नका.

९) गणपतीला कधीही सफेद चंदनाचा टीळा लावू नका.

१०) भाद्रपद चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेऊ नका, असे केल्याने कलंक लागण्याची भीती असते.