स्तनपान करताना वेदना होतात…! (How To Gain Relie...

स्तनपान करताना वेदना होतात…! (How To Gain Relief If You Experience Pain While Breast Feeding)


माझी प्रसूती होऊन 10 दिवस झाले. बाळ पूर्ण दिवसांचं आणि साडेतीन किलो वजनाचं आहे. बाळाला स्तनपान पुरेसं होत नाही.
काय करावं?

 • नम्रता कराडे, सातारा
  दर वेळी स्तनपानासाठी बसताना दोन ग्लास पाणी प्या. आहारात भरपूर पाणी, दूध, प्रथिनं घ्या. बदाम, खारीक, मेथी, खसखस इत्यादी घेतल्यानेही फायदा होतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधंही घेता येतील. स्तनपान वाढवण्यासाठी काही व्यायामही असतात. ते शिकून घ्या. तरीही समस्या असल्यास, दर वेळी स्तनपानानंतर बाळाला डब्याचं दूध द्या.
 • माझं बाळ 15 दिवसांचं आहे. हल्ली स्तनपान करताना डाव्या स्तनामध्ये वेदना होतात. ते लालसर आणि कडक झालं आहे. मला तापही येत आहे. काय करावं?
 • सोनल काळे, मुंबई
  तुमच्या डाव्या स्तनामध्ये जंतुसंसर्ग झालेला आहे. तुम्ही ताबडतोब स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवा. त्यांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक्स आणि वेदनाशामक गोळ्या घ्या. स्तनाला बर्फाचा शेक करा. त्या स्तनातून बाळाला स्तनपान करू नका. मालिश करून त्या स्तनातील दूध काढून टाकून, ते स्तन रिकामे ठेवा.
 • माझं बाळ 7 दिवसांचं आहे. त्याचं वजन सव्वादोन किलो आहे. त्याला स्तनाग्रं तोंडात नीट पकडता येत नाहीत. त्याच्यासाठी ती मोठी पडतात. काय
  करता येईल?
  – यामिनी खोत, ठाणे

  बाळ जसजसं मोठं होत जाईल, तसतसं त्याला हळूहळू स्तनाग्रं पकडता येतील. तोपर्यंत निपल शिल्ड वापरून स्तनपान करता येईल. निपल शिल्ड वापरताना तिच्या निर्जंतुकीकरणाविषयी डॉक्टरांकडून माहिती करून घ्या. तसंच दूध निर्जंतुक केलेल्या वाटीत काढून, निर्जंतुक केलेल्या चमच्यानेही बाळाला पाजता येईल.
 • माझं बाळ 15 दिवसांचं आहे. स्तनपान व्यवस्थित आहे; परंतु मला दोन्ही काखेमध्ये गाठी आल्या आहेत. असं कशामुळे होत असेल?
  – रश्मी नेने, पुणे

  स्त्रीच्या काखेमध्ये स्तनाच्या उती पसरलेल्या असतात. स्तनपानाच्या काळात जशी स्तनांची वाढ होते; तशीच त्यांचीही होते; म्हणूनच काही जणांना स्तनपान सुरू झाल्यावर काखेत गाठी येतात. मात्र घाबरण्याचं कारण नाही. या गाठी स्तनपान थांबवल्यानंतर आपोआप कमी होतील.