नवरा दुसर्या स्त्रीच्या प्रेमात पडलाय हे कसं ओळ...

नवरा दुसर्या स्त्रीच्या प्रेमात पडलाय हे कसं ओळखाल? (How To Find Out Whether Your Husband Is In Love With Another Woman)

गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला तुमच्या पतीच्या वागण्यात खूप बदल जाणवत आहे. काही वेळा हा बदल, ते दुसर्‍याच्या प्रेमात तर पडले नसतील ना? अशी शंका मनात आणतो. खरोखर एखाद्याला विश्वासार्ह होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, परंतु एखाद्याला फसवण्यासाठी एखादे चुकीचे पाऊलही पुरेसे असते. तुम्हाला जर अशी भीती सतावत असेल तर तुमच्या नवर्‍यातील बदल वेळीच लक्षात घ्या आणि वेळीच त्याची काळजी घ्या. तुमचा नवरा दुसर्‍याच्या प्रेमात पडला असेल तर या काही गोष्टींचा विचार करा. या गोष्टी त्यांच्याबाबतीत योग्य ठरत असतील, तर तुम्ही स्वतःची काळजी घेण्याची, तसेच त्यांना योग्य मार्गावर आणण्याची वेळ आली आहे, असे समजा.

1) सेक्स लाईफ पहिल्यासारखे राहिले नाही का?
पूर्वी तुमचे सेक्स लाईफ खूप रोमँटिक होते, पण आजकाल तुमच्या पतीला सेक्समध्ये विशेष रस नाही. पूर्वी ते रोमँटिक व्हायचे, स्वतःहून पुढाकार घ्यायचे. परंतु आजकाल जेव्हा तुम्ही पुढाकार घेता तेव्हा ते, मी थकलो आहे, तणावात आहे, कामाचा ताण खूप आहे किंवा इतर कोणतेही कारण देतात. काहीवेळा ही कारणं अपराधीपणाच्या जाणीवेतून येतात, जी दुसर्‍या प्रकरणामुळे असते. तेव्हा सावध राहून नवर्‍याचे सेक्स टाळण्याचे निमित्त कितपत खरे आहे? ते तपासा.

2) नवरा घरी अस्वस्थ असतो का?
पूर्वी नवरा तुमच्यासोबत घरी आनंदात वेळ घालवायचा. परंतु आजकाल त्याची देहबोली आणि वागणूक पाहून तो खूप अस्वस्थ दिसतोय. त्याने तुमच्याबरोबर बाहेर जाणे जवळजवळ बंद केले आहे. घरी असतानाही त्यांना खूप कंटाळा येतो आणि एकटे बाहेर जाण्याची संधी ते सोडू इच्छित नाही. त्यांच्या सवयीतील या बदलाकडे दुर्लक्ष करू नका आणि त्याचे कारण शोधायला वेळही लावू नका.

3) आजकाल पती नेहमी सुगंधीत असतात का?
तुमचा नवरा पूर्वी कधीच फॅशन कॉन्शस नव्हता. दिवसातून एकदा डिओ किंवा परफ्यूम लावणे त्याच्या सवयीमध्ये होते, परंतु आता तो सकाळ-संध्याकाळ, अगदी रात्री देखील सुगंधीत राहत असेल तर प्रकरण नाजूक आहे, आपण सतर्क राहावे.

4) पतीला नवीन ट्रेंडबद्दल माहिती होऊ लागली आहे का?
याआधी तुमच्या पतीला नवनवीन ब्रँड्स आणि फॅशनची विशेष कल्पना नव्हती, पण आजकाल अचानक तो त्याच्या कपड्यांबाबत ट्रेंडी झाला आहे. एवढेच नाही, या उप्पर ते तुम्हाला लेटेस्ट ट्रेंडबद्दल सल्लेही देत आहेत. तर त्यांचं हे वागणं तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे आणि तुम्हाला या प्रकरणाच्या तळाशी जाणे आवश्यक आहे, असं समजावं.

5) नवरा आजकाल व्यवस्थित तयारी करून ऑफिसला जातो का?
पूर्वी शनिवारी ऑफिसला जायचे असेल तर कंटाळा करणारे पतीदेव, आता शनिवारी देखील आनंदाने घराबाहेर पडतात. बाजारात जाणे असो की जीममध्ये, पूर्वी कपडे निवडायला फार वेळ न घेणारे साहेब आता कपड्यांची विशेष काळजी घेऊ लागले आहेत. घराबाहेर पडण्यापूर्वी तयार होण्यास बराच वेळ  लावत आहेत, हे लक्षात येताच समजावे की, कुठेतरी पाणी मुरतंय.

6) पती सारखे सारखे दचकतात का?
तुम्ही बेडरूममध्ये प्रवेश करताच, अचानक लॅपटॉपच्या विंडोज बंद केल्या जातात. मोबाईल ऑपरेट करण्यासाठी वापरण्यात येणारा पासवर्ड किंवा पिन नंबर अचानक बदलला आहे. त्यांनी तुम्हाला त्यांचा पिन नंबर सांगितलेला नाही. किंवा सांगून पुन्हा बदलला आहे. अचानक त्यांनी दुसरा मोबाईल घेतला आहे आणि त्याबद्दल तुम्हाला विचारलेही नाही, तर तुमचा त्यांच्यावरील संशय निराधार नाही हे समजून घ्या. त्यांच्या बदललेल्या नवीन सवयींमागील कारणं जाणून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा.

7) पती अनेक सबबी देऊ लागले आहेत का?
आजकाल अनेकदा ते रात्री उशिरा घरी येतात आणि येताच ऑफिसमधील सहकारी, ऑफिसमधील वातावरणास शिव्या घालू लागतात. ऑफिसमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरु असल्याचा बहाणा तर  सांगतात परंतु पार्टीमधील मेन्यू विचारल्यानंतर अचानक त्यांना काही आठवेनासे होते. आणि मग मी आता थकलो आहे, असे म्हणत तुम्हालाही झोपण्याचा सल्ला देतात. अन् स्वतःही गाढ झोपतात. सबब जेवढी मोठी असेल, तेवढीच पोल खोल होण्याची भीती अधिक अशा वेळी तुम्हाला पतीची हेरगिरी करण्याची गरज आहे, असे समजावे.

8) पतीचा बचाव दिवसेंदिवस मजबूत होत आहे का?
तुम्ही नेहमी पतीच्या उशिरा येण्याबद्दल तक्रार करत असाल आणि तो तुम्हाला दहापैकी पाच वेळाच कारण सांगतो आहे. परंतु आजकाल तो नेहमीच उशीरा येतो आणि तुमच्या तक्रारीवर त्याचा बचाव भारी पडतो आहे. ते तुम्हाला एक गोष्ट सांगू लागतात की, ते काम करून खूप थकतात आणि तुमच्याकडून त्यांना नेहमी तक्रारी येतात, प्रोत्साहन मिळत नाही. किंवा ते तुम्हालाच विचारू लागतात की, तुम्ही इतक्या ओव्हर पझेसिव्ह का आहात? किंवा तुम्ही थोडे प्रॅक्टिकल का होत नाही? अशी उत्तरं मिळाल्यानंतर मेंदुला काहीतरी गडबड असल्याचा संदेश मिळतो.

9) दोघांमध्ये टच थेरपी आता उरली नाही का?
पूर्वी तुम्ही आठवड्यातून एकदा एकत्र बसत होतात आणि खूप बोलत होतात. एकमेकांच्या हातांचा तो स्पर्श एखाद्या टच थेरपीप्रमाणे काम करायचा. आता तुमच्यासाठी वेळ काढायला त्यांच्याकडे वेळ नाही. म्हणून हे महत्वाचे आहे की तुम्ही यामागील कारण शोधून काढा आणि पतीला गमावण्यापूर्वी पुन्हा मिळवा.