अजीर्णावर सोपे उपाय (How to control Indigestion)
- 1) सुंठ, काळीमिरी, पिंपळी व सैंधव मीठ समप्रमाणात घेऊन चूर्ण तयार करा. हे 5 ग्रॅम चूर्ण
ताकात एकत्र करून प्यायल्यास, अजीर्णाचा त्रास होत नाही. - 2) जेवणापूर्वी 1 ग्रॅम हिंग पूड खा, अजीर्णाची समस्या नाहीशी होते. जेवणासोबत ताक घेत
असल्यास त्यातही हिंग घालून पिता येईल. - 3) गोड डाळिंबाच्या रसामध्ये भाजलेलं जिरं आणि गूळ एकत्र करून दिवसातून 2-3 वेळा घ्या.
- 4) 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा लिंबूरस, 1 चमचा आल्याचा रस आणि 2 चमचे मध
एकत्र करून प्या. - 5) तुळशीच्या पानांचा 10 ग्रॅम रस घेतल्यास, अजीर्णाचा आणि ढेकर येण्याचा त्रास कमी होतो.