नैराश्य वेळीच आवरा (How To Come Out Of Depressi...

नैराश्य वेळीच आवरा (How To Come Out Of Depression?)

नैराश्य ही अशी एक नकारात्मक भावना आहे की जी मनुष्याच्या आयुष्यातून सुखाची जाणीवच मारून टाकते. अशा व्यक्तींचे कोणत्याच गोष्टींमध्ये मन रमत नाही. काही वेळा तर त्यांची जगण्याची इच्छाच मरून जाते. म्हणूनच नैराश्याचे संकेत मिळताच त्यावर उपाय केले तर त्यातून सहजपणे बाहेर पडणे शक्य आहे. आपल्या आजूबाजूलाही एखादी व्यक्ती नैराश्याने ग्रासलेली आढळ्यास त्यांना आपण मदत केली पाहिजे. त्यांच्या सोबत वेळ घालवून त्यांच्याशी बोलून त्यांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत केली पाहिजे. एवढ करूनही सकारात्मक परिणाम दिसून आला नाही तर तज्ञ व्यक्तीची मदत घ्या येथे आपण काही सोपे आणि परिणामकारक उपाय पाहणार आहोत.

नैराश्याची कारणं
कुटुंबातील एखादया सदस्याचा अचानक मृत्यू झाला, एखादया व्यक्तीच व्यवसायात मोठं नुकसान झालं, एखाद्याचं लग्न मोडलं. अशी कोणतीही घटना किंवा बाब की जी आपण प्रयत्न करूनही विसरू शकत नाही. तसेच सहनही करू शकत नाही. अगदी सहा महिन्यानंतरही जर तुम्ही ती गोष्ट विसरू शकत नाही आणि त्यामुळे जर तुमचं मन इतर कशात रमत नसेल तर ती नैराश्याची स्थिती आहे, असे समजा.

नैराश्याची लक्षणं
–   नैराश्याच्या सुरवातीच्या दिवसांत कोणत्याही गोष्टीतील रस कमी होऊ लागतो.
–   नंतर आपण लोकांमध्ये मिसळणं कमी करू लागतो.
–   सामाजिक समारंभात सहभागी होण्याची भीती वाटते. घरातून बाहेर पडावेसे वाटत नाही.
–   कोणत्याही कामात मन रमत नाही त्यामुळे सतत झोपण्याची सवय लागते.
–   खाण्यापिण्याची इच्छा मरते.
–   अशाप्रकारची माणसं सहा महिन्यानंतरही कायम राहिली तर या व्यक्तींच्या मनात आपलं आयुष्य संपवून टाकण्याचे विचार येऊ लागतात. त्यांची जगण्याची इच्छा मरते. अशा निराश व्यक्तीला पाहिल्यास कधी कधी आपल्याला त्यांची कीव करावीशी वाटते. त्यांच्या बद्दल आपल्याला वाईट वाटते परंतु नैराश्याला हरविणे कठीण वाटले तरी अश्यक्य नाही हे लक्षात घ्या.

नैराश्य दूर करण्याचे काही सोपे उपाय


–    नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीची साथ. अशी व्यक्ती कि जिच्याशी तुम्ही मनातलं मनमोकळेपणाने बोलू शकता जिला तुम्ही तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी सांगता मग ती व्यक्ती तुमच्या कुटुंबातील वा मित्र-मैत्रिणींपैकी कोणीही असू शकते. या व्यक्तीशी तुम्ही बोला तुमच्या नैराश्याचं कारण त्यांना सांगा.

–    स्वतःची जीवनशैली बदला. दररोज व्यायाम, योग, ध्यानधारणा, सकस आहार, झोप इत्यादी गोष्टींचे महत्व जाणून त्यांना आपल्या रोजच्या दैनंदिनी मध्ये समाविष्ट करा. हळूहळू तुमच्या मनावरील ताण दूर होऊन तुम्ही नैराश्यातून नक्की बाहेर याल मात्र ऐवढे करूनही जर तुम्ही यातून बाहेर पडला नाहीत तर मग तज्ज्ञांनाचा सल्ला घ्या. परंतु या स्थितीकडे दुर्लक्ष्य करू नका.