तुम्ही योग्य मापाची ब्रा वापरता का? (How To Cho...

तुम्ही योग्य मापाची ब्रा वापरता का? (How To Choose The Right Bra, The Ultimate Guide To Choosing The Perfect Bra)

ब्रा ही प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त वस्तू असते. हे एक अंडरगारमेंट आहे जे स्तनांना झाकण्यासाठीच नाही तर स्तनांना सपोर्ट करण्यासाठी वापरण्यात येतं. महिलांसाठी अत्यंत गरजेचं असं हे वस्त्रप्रसाधन असूनही तुम्हाला माहीत आहे, जवळपास ८० टक्के महिला चुकीच्या मापाची ब्रा वापरतात. मुळात बऱ्याचशा महिला दुकानदाराकडे जाऊन ब्रा विकत घेण्यासाठी लाजतात. कधी लाजेने तर कधी घाईघाईत अथवा नीट विचार न करता चुकीच्या मापाची ब्रा घेतात. त्यामुळे स्तनांचा आकार बिघडतो.

ब्रा वापरताना आपण अनेक चुका करत असतो. जसे की, आपण ब्रा सतत घालून ठेवतो. रोज बारा तासांपेक्षा जास्त वेळ सलग ब्रा घालयची नसते. तसेच खूप घट्ट ब्रा घातल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही… ब्रा शी निगडीत अशा अनेक जरुरी गोष्टी आहेत की, ज्या प्रत्येक महिलेला माहित असणे आवश्यक आहे.

ब्रा ची योग्य निवड कशी करावी?

खूप घट्ट वा सैल ब्रा घातल्याने आउटफिटचं सौंदर्य बिघडतं. एवढंच नाही तर आपल्या आरोग्यावरही त्याचा अयोग्य परिणाम होत असतो. म्हणूनच पाहुया योग्य ब्राची निवड कशी करावी?

  • ब्रा नेहमी नामाकिंत लॉन्जरी दुकानातूनच खरेदी करा. अशा दुकानांत प्रोफेशनल व्यक्ती असतात; ज्या आपल्याला ब्रा ची योग्य निवड करण्यात मदत करतात.
  • ब्रा विकत घेताना कप आणि बेल्टची योग्य साईज पाहून खरेदी करा. तुम्ही सडपातळ आहात परंतु तुमची ब्रेस्ट साईज जास्त आहे, तर तुमच्या कप आणि बेल्टच्या साईजमध्येही जास्त फरक असणार. तुम्ही ३८ नंबरची ब्रा घालत असलात तर कपच्या साईजप्रमाणे ३८ मध्येही ए, बी, सी, डी तून योग्य निवड करावी लागते.
  • जेव्हा तुम्ही ब्रा ची खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा ब्रा बँड आणि शोल्डर स्ट्रेप्सच्या खालून तुमच्या हाताची दोन बोटं सहजतेने आत जाऊ शकतील हे पाहून घ्या
  • हेवी ब्रेस्ट असणाऱ्या महिलांनी लहान साईजची ब्रा वापरण्याऐवजी मिनिमायजर ब्रा घालून पाहावी.
  • तसेच छोटे ब्रेस्ट असणाऱ्या महिलांनी मोठ्या साईजची ब्रा घालण्याऐवजी पॅडेड, मॅक्सिमायजर, पुश-अप इत्यादी ब्रा वापरून पाहाव्या.
  • बॅकलेस किंवा ऑफ शोल्डर वन पीस ड्रेस घालायचा असल्यास त्यासोबत बॅकलेस ब्रा कप्स घाला. हे ब्रेस्टवर चिकटून राहतात. ज्यामुळे ब्रेस्टला सपोर्ट आणि बॉडीला परफेक्ट आकार मिळतो. अशा आउटफिटसोबत कप अटॅच्ड असतात.
  • तुमची ब्रेस्ट साईज लहान आहे आणि तुम्हाला असा ड्रेस घालायचा आहे, ज्यात क्लीवेज दिसत आहे, तर त्या ड्रेससोबत पुशअप ब्रा घाला. यामुळे दोन्ही ब्रेस्टमधील गॅप भरेल आणि बॉडीला परफेक्ट शेप मिळेल.
  • प्लस साईज (स्थूल) महिलांसाठी कॉर्सेटचा पर्याय उत्तम आहे. इव्हिनिंग वेअर्स सोबत कॉर्सेट घातल्यास ब्रेस्टला सपोर्ट आणि अपर बॉडीलाही परफेक्ट शेप मिळतो.
  • काही ब्रा अशा असतात, ज्यांच्या स्ट्रेप्स काढता आणि पुन्हा लावता येतात. तुमच्या सोईनुसार या ब्रा ची निवड तुम्ही करू शकता.
  • ऑफिसला जाताना फॉर्मल वेअर्स सोबत नेहमी फुल कप ब्रा वापरा. या ब्राचे अंडरवायर्ड कप्स ब्रेस्टला सपोर्ट देतात आणि अपर बॉडी सुडौल बनवतात.

ब्रा चे प्रकार

ब्रा विभिन्न आकार आणि प्रकारामध्ये मिळते. ब्रा घालण्याची विविध उद्दिष्टं असतात आणि ती या वेगवेगळ्या ब्रा मुळे पूर्ण होतात. प्रत्येक महिलेची शरीरयष्टी तसेच कपडे परिधान करण्याचा अंदाज वेगळा असतो, त्यामुळे त्यांच्या गरजाही भिन्न असतात. आउटफिटला अनुसरून कोणती ब्रा निवडावी, हे जाणून घेण्यासाठी ब्रा चे प्रकार पाहुया.

मॅक्सिमायजर

ही ब्रा पुश-अप, पॅडेड आणि अंडरवायर्ड असते. स्मॉल ते मिडियम साईजच्या महिला क्लीवेज आणि सपोर्टसाठी ही ब्रा वापरुन पाहू शकतात. ही ब्रा तुम्ही फॉर्मल, एथनिक, पार्टी वेअर ड्रेस सोबत घालू शकता.

मिनिमायजर

ही फुल कप ब्रा असते, ज्यात पॅड असत नाही. मिडियम ते मोठी ब्रेस्ट साईज असलेल्या महिलांसाठी हा चांगला पर्याय आहे. ही ब्रा ब्रेस्टला लहान लूक देते. रोजच्या फॉर्मल व इनफॉर्मल ड्रेससोबत ही ब्रा वापरता येते.

अंडरवायर्ड

ही डेमी कप आणि पॅडेड ब्रा असते. छोटे आणि मिडियम ब्रेस्ट असलेल्या महिलांसाठी हा उत्तम पर्याय आहे. रोजच्या फॉर्मल व इनफॉर्मल ड्रेससोबत ही ब्रा वापरता येते. मात्र अंडरवायर्ड ब्रा काही तासांकरिताच घालावी, खूप वेळ घालून ठेवू नये.

टी-शर्ट ब्रा

या पॅडेड ब्राच्या स्ट्रेप्स पारदर्शक असतात. छोटे आणि मोठे अशा दोन्ही ब्रेस्ट साईजसाठी या ब्रा उपयुक्त असतात. जिम वेअर, टी-शर्ट, शीयर पार्टी वेअर सोबत ही घालता येते.

स्पोर्ट्स ब्रा

ही नॉन पॅडेड आणि नॉन अंडरवायर्ड ब्रा असून, हिच्या स्ट्रेप्स रुंद असतात. ही ब्रा छोट्या आणि मिडियम ब्रेस्टसाठी उत्तम असते. मोठे ब्रेस्ट असलेल्या महिला एक्सरसाईज करताना आपल्या नॉर्मल ब्राच्या वर ही घालू शकतात. त्यामुळे ब्रेस्टला सपोर्ट आणि संरक्षण मिळू शकते.

मॅटर्निटी ब्रा

ही फुल कप आणि नॉन पॅडेड ब्रा असते. ही ब्रा विशेषतः स्तनपान करणाऱ्या आईंसाठी बनवण्यात आली आहे. या ब्रा मध्ये फ्लॅप अथवा ओपनिंग लेसदेखील असते जी स्तनपान करणाऱ्या आईसाठी अतिशय सोयीस्कर असते. याचं कापड अगदी मुलायम असतं.

मल्टीवेअर ब्रा

ही ब्रा तुम्ही नॉर्मल स्ट्रेप्स, स्ट्रेपलेस, हॉल्टरनेक, क्रॉस स्ट्रेप आणि ऑफ शोल्डर अशा पाच तऱ्हेने वापरता येते. ही फुल कप, पॅडेड आणि अंडरवायर्ड ब्रा असते. मिडियम ते मोठ्या ब्रेस्टच्या महिलाही ही वापरु शकतात. पार्टी वेअर, फॉर्मल व ऑफिस वेअर सोबत ही ब्रा घातली जाते.

डेली वेअर ब्रा

ही ब्रा नॉन पॅडेड आणि फुल कप असते. अतिशय सोयिस्कर अशी ही ब्रा सर्वच महिला वापरु शकतात. रोजच्या कपड्यांसाठी ही वापरली जाते. पण ही पारदर्शक कपड्यांत वापरु नये.

ट्यूब टॉप

ही ब्रा स्ट्रेपलेस आणि नॉन पॅडेड असते. लहान साईजपासून मिडियम ब्रेस्टच्या महिला ही घालतात. टी-शर्ट, जिम वेअर, स्ट्रेपलेस पार्टी वेअर सोबत ही ब्रा वापरता येते.

पुशअप ब्रा

या पॅडेड ब्रा स्टेप्ससह असतात आणि स्ट्रेपलेस देखील असतात. ही ब्रा छोट्या आणि मिडियम ब्रेस्ट असलेल्या महिलांसाठी ज्यांना क्लीवेजची गरज असते, त्यांच्यासाठी उत्तम असते. पार्टी ड्रेसमध्येही वापरतात.

ड्रेस अप ब्रा

ही ब्रा लेसी, डेमी-कप आणि नॉन पॅडेड असते. छोट्या आणि मिडियम ब्रेस्ट असलेल्या महिला ही वापरु शकतात. या ब्रामध्ये जास्त सपोर्ट नसतो त्यामुळे ही काही तासांकरिता घालण्यास ठीक आहे. तुम्ही ही ब्रा हनीमुन दरम्यान वा ड्रेसी फिलिंगसाठी घालू शकता.

डेमी-कप ब्रा

ही पॅडेड ब्रा अंडरवायर सपोर्टसह मिळते. छोट्या आणि मिडियम ब्रेस्ट असलेल्या महिला ही वापरु शकतात. रोजच्या फॉर्मल व इनफॉर्मल ड्रेससोबत ही ब्रा वापरता येते.