मजबूत आणि लांबसडक केसांसाठी, केसांना असे लावा त...

मजबूत आणि लांबसडक केसांसाठी, केसांना असे लावा तेल (How To Apply Hair Oil: Step By Step Guide To Apply Hair Oil)

हल्ली ज्याला बघावं तो केसांच्या समस्या सांगत असतो. केसांच्या जितक्या समस्या तितकी त्याची कारणं वेगवेगळी असतात. त्यातील एक कारण असं असतं की, आपली केसांना तेल लावण्याची पद्धत. ही पद्धत चुकीची असल्यामुळे केसांना त्या तेलाचा फायदा होत नाही. परंतु आपण योग्य पद्धतीने जर तेल लावलं तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला घेता येईल. ही योग्य पद्धत कोणती ते पाहूया…

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत
केसांना शाम्पू करण्याच्या दोन तास आधी तेल लावावे, रात्रभर तेल लावून ठेवू नये.
केसांना वरवर तेल लावून चालणार नाही, आपल्या बोटांनी गोल गोल मसाज करत तेल लावावे.
तुमच्या केसांना खाली फाटे फुटले (दुतोंडी) असतील तर केवळ केसांच्या मुळाशी तेल लावून चालणार नाही; केसांच्या टोकालाही तेल लावावे.
खोबरेल तेलामध्ये मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह आणि पोटॅशियम यांसारखी पोषकतत्वे असतात, ज्यामुळे केस मजबूत बनतात.
१०० ग्रॅम खोबरेल तेलामध्ये ३ ग्रॅम कापूर बारीक पूड करून मिसळा. हे तेल रोज रात्री केसांना लावा. केसांच्या मुळाशी मसाज करा. त्यामुळे केसात कोंडा राहणार नाही.
तुम्हाला केसांना तेल लावायचे असल्यास किंवा केस कोरडे झाले असल्यास केवळ तेल लावू नका. तेल लावण्याची एक पद्धत ठेवा आणि त्याच पद्धतीने नेहमी तेल लावा. तेलाच्या नियमित वापराने केस लांब आणि दाट होतात आणि केसांचे गळणेही कमी होते.
रात्री झोपताना खोबरेल तेल, महाभृंगराज तेल किंवा तिळाचे तेल केसांना लावून हलक्या हाताने हळूहळू केसांना मसाज करावा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा असे केल्यास केस लवकर सफेद होणार नाहीत.

मनावरील ताण घालवायचा म्हणून तेल लावत असाल तर केसांना मस्त चंपी करून तेल लावा. तणावात असताना चंपी इतका प्रभावी उपचार असूच शकत नाही.
डाळिंबाचे दाणे, पाने आणि साली बारीक करून त्याचा लगदा बनवा. मग तो तीळाच्या तेलात मिसळून मंद आचेवर शिजवा. जेव्हा सर्व वस्तू शिजतील आणि तेल शिल्लक राहील त्यावेळेस ते तेल गाळून घ्या. हे तेल नियमितपणे केसांना लावा. असे केल्याने टक्कल पडणार नाही.
तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जास्त तेल लावू नये. आठवड्यातून एक-दोन वेळाच तेल लावा.