अभिनेत्री पूजा हेगडे झाली विवाह देवता! (How The...

अभिनेत्री पूजा हेगडे झाली विवाह देवता! (How The Bollywood Star Became Goddess Of Marriage?)

आधुनिक नववधू डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या खास वेषभूषेत बॉलिवूड तारका पूजा हेगडे नुकतीच एका फॅशन शो मध्ये अवतरली. अन्‌ तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

बॉम्बे टाईम्सच्या फॅशन वीकमध्ये पूजा ‘कलकी’चे ‘हेरा’ हे फॅशनेबल कलेक्शन घालून दिमाखात चालली. घेरदार, श्रीमंती कलाकुसर केलेला लेहेंगा आणि कंचुकी असा तिचा वेष होता. पॅलेस ग्रीन व्हेलवेट असे त्या ड्रेसच्या रंगाला नाव देण्यात आले होते. पूजाच्या कमनीय बांध्याला हा ड्रेस खुलून दिसला.

ग्रीक पुराणकथेतून ‘हेरा’ हे नाव या कलेक्शनला देण्यात आले होते. त्याचा अर्थ विवाह देवता असा होतो. नववधूचा ड्रेस म्हणून ठरविलेल्या या उंची ड्रेसमध्ये देखणी पूजा हेगडे खरोखरीच विवाह देवता म्हणून प्रसिद्ध झाली.