तसलीमा नसरीन यांनी प्रियंका चोप्राचे नाव न घेता...

तसलीमा नसरीन यांनी प्रियंका चोप्राचे नाव न घेता, सरोगसीबाबत उभा केला वाद; लोकांनी व्यक्त केली नाराजी (‘How Do Those Mothers Feel When They Get Their Readymade Babies Through Surrogacy’ Taslima Nasreen Makes Controversial Statement On Surrogacy)

प्रसिद्ध लेखिका तसलीमा नसरीन नेहमीच आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता ती तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. प्रियंका चोप्राला टार्गेट करण्याच्या उद्देशाने तिने हे ट्विट केल्याचे मानले जात आहे.

शुक्रवारी संध्याकाळी बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांनी घोषणा केली की ते सरोगसीद्वारे एका मुलाचे पालक बनले आहेत. सरोगसीवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, लेखिका तसलीमा नसरीन यांनी या प्रक्रियेवर टीका केली आणि सरोगसीद्वारे मातृत्व प्राप्त करणाऱ्या मातांच्या भावनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तसलीमा नसरीन यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. “ज्या मातांना सरोगसीद्वारे रेडीमेड मुले मिळतात, त्यांना जन्म देणाऱ्या मातांइतकीच भावनिक ओढ त्यांच्या मुलाशी असते का?” असे नसरीन यांनी म्हटले आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये “गरीब महिलांमुळे सरोगसी शक्य आहे. श्रीमंत लोकांना त्यांच्या स्वार्थासाठी नेहमीच समाजात गरिबी पहायची असते. जर तुम्हाला मूल वाढवायचे असेल, तर बेघर मुलांना दत्तक घ्या. मुलांना तुमचे गुण वारसाहक्काने मिळाले पाहिजेत. हा फक्त स्वार्थीपणा आहे. अहंकारी अहंकार,” असेही म्हटले आहे. यानंतर तसलीमाने तिसरे ट्विटही केले ज्यामध्ये तिने सरोगसी आणि बुरख्यावर आपले मत व्यक्त केले.

तसलीमा यांच्या या ट्विटने बहुतांश लोक नाराज झाले आहेत. त्यांनी हे ट्विट असंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे. तसेच सोशल मीडिया युजर्सनी ही वैयक्तिक निवड आहे आणि बऱ्याच बाबतीत लोक वैद्यकीय कारणांसाठी सरोगसीचा पर्याय निवडतात असे म्हटले आहे. तसलीमा यांनी प्रियंका चोप्राच्या नावाचा उल्लेख केला नाही. पण तिचे हे ट्विट प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या घोषणेनंतर आले आहे. त्यामुळे या टीकेचा संबंध त्यांच्याशी लावला जात आहे.

सरोगसीचे दोन प्रकार आहेत. ट्रॅडिशनल सरोगसीमध्ये होणाऱ्या बाळाच्या पित्याच्या शुक्राणूंचं सरोगेट मदरच्या बीजांडाशी मिलन घडवलं जातं. त्यामुळे संबंधित महिला ही जन्माला येणाऱ्या बाळाची जैविक आई अर्थात बायोलॉजिकल मदर असते. जेस्टेशनल सरोगसीमध्ये मात्र सरोगेट मदरचं आणि बाळाचं रक्ताचं नातं नसतं. होणाऱ्या बाळाच्या आई-वडिलांच्याच अनुक्रमे बीजांड आणि शुक्राणूचा संयोग प्रयोगशाळेत केला जातो. त्यातून तयार झालेला भ्रूण टेस्ट ट्यूबद्वारे सरोगेट मदरच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो.