सतीश शाह यांना लंडन एअरपोर्टला आला वर्णभेदाचा अ...

सतीश शाह यांना लंडन एअरपोर्टला आला वर्णभेदाचा अनुभव, टिपण्णी करणाऱ्याला अभिनेत्याने दिले सडेतोड उत्तर (‘How Can They Afford 1st Class?’ Satish Shah Faces Racism At London Airport, Actor’s Befitting Response Wins Internet, See Tweet)

सतीश शाह हे एक उत्कृष्ट अभिनेता आहेत. अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये त्यांनी अभिनयाने आपल्या व्यक्तिरेखा अगदी जिवंत साकारल्या होत्या. लोक तर त्यांना त्या पात्रांच्या नावाने ओळखायचे. सारा भाई vs सारा भाई मध्ये देखील त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. सतीश शाह यावेळी कोणत्याही पात्र, चित्रपट किंवा टीव्ही शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले नसून, आपल्या वैयक्तिक अनुभवासाठी चर्चेत आहेत.

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सतीश शाह यांना वर्णद्वेषी वक्तव्याचा सामना करावा लागला, परंतु वर्णावरुन चेष्ठा करणाऱ्यांना सतीस यांनी एकदम चोख उत्तर दिले आहे. त्यामुळे सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटत आहे. एवढेच नाही तर हिथ्रो विमानतळ प्राधिकरणाने ट्विटरवर त्यांची माफीही मागितली आहे.

सतीश शहा फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत असताना त्यांना पाहून एका कर्मचार्‍याने आपल्या  सहकाऱ्याला विचारत होता की या लोकांना फर्स्ट क्लास कसा काय परवडत असेल? त्यानंतर ते लोक गंमतीने हसायला लागले. इतक्यात सतीश शहा यांनी त्यांना अभिमानाने आणि हसत उत्तर दिले – कारण आम्ही भारतीय आहोत.

अभिनेत्याने ट्विटरवर आपला अनुभव शेअर केला, त्यानंतर सर्वांनी त्यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे.  सर, आम्हाला तुमचा अभिमान आहे असे अनेकजण त्यांना कमेंटमध्ये सांगत आहे. लोक त्यांच्या ट्विटला रिट्विट करत आहेत तसेच एअरलाइन्सबद्दल सत्य सांगत बरेच लोक आपले अनुभव देखील शेअर करत आहेत.

सतीश यांनी ट्विटमध्ये लिहिले – जेव्हा मी हिथ्रो कर्मचारी आपल्या सहकाऱ्याला आश्चर्याने विचारताना ऐकले की “हे लोक प्रथम श्रेणी कसे घेऊ शकतात?” तेव्हा मी अभिमानाने हसत उत्तर दिले “कारण आम्ही भारतीय आहोत”

एअरलाइन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे अभिनेत्याला प्रत्युत्तर दिले आहे आणि या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत लिहिले आहे – गुड मॉर्निंग, आम्हाला या घटनेबद्दल खूप वाईट वाटते. तुम्ही आम्हाला (डायरेक्ट मेसेज) DM करू शकता का?