हनिमूनला अभिषेकने अशाप्रकारे बेड तोडला, ऐश्वर्य...

हनिमूनला अभिषेकने अशाप्रकारे बेड तोडला, ऐश्वर्या रायने सांगितला किस्सा ( How Abhishek Bachchan Broke The Bed On Honeymoon Night : Aishwarya Rai Narrated The Story )

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्या एकमेकांना अगदी अनुरुप आहेत. त्यातीलच एक जोडी म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन. ही जोडी सध्या खूप चर्चेत आहेत. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन अनेकदा एकत्र दिसत आहेत. या पार्टीत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय व्यतिरिक्त अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. तिथे सलमान खान देखील आला होता.

बऱ्याच काळानंतर ऐश्वर्या राय आणि सलमान खान एकमेकांसमोर आले होते.  काही दिवसांपूर्वी, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय आयफा 2022 च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकत्र दिसले होते. सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे,  ज्यामध्ये दोघेही त्यांच्या हनिमूनचा किस्सा सांगताना दिसतात.

ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेही त्यांच्या वैवाहिक नात्यात खूप सुखी आहेत. या जोडीला पाहून सगळेच त्यांचे कौतुक करताना दिसतात. लग्नाच्या अनेक वर्षानंतरही या दोघांचे एकमेकांवरील प्रेम कमी झालेले नाही. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना आराध्या बच्चन ही  11 वर्षांची मुलगी आहे. आराध्याही सध्या मीडियाच्या चर्चेचा विषय असते.

सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघेही एकमेकांची मजा घेताना दिसतात . या व्हिडिओत अभिषेकने त्यांच्या हनिमूनच्या दिवशी पलंग कसा तोडला तो किस्सा ऐश्वर्याने सांगितला.

सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत रिलेशनशिपमध्ये आली. अभिषेक बच्चनसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर तिने त्याच्याशी लग्नही केले.  ऐश्वर्या आणि अभिषेक लग्नाआधी एकमेकांचे चांगले मित्र होते. ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक जुना मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये अभिषेकने हनीमूनच्या दिवशी बेड कसा तोडला हे सांगितले. हनिमूनला अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायची गंमत करण्यासाठी बेडचे सर्व स्क्रू सैल केले होते आणि थोड्यावेळाने ऐश्वर्या त्या बेडवर बसली. पण स्क्रू सैल केल्यामुळे ती बेडवरुन पडली आणि तो बेडही तुटला. अभिषेकने केलेल्या गंमतीवर तिने त्याच्यासोबत २ दिवस अबोला धरला होता.