बॅकलेस शिमरी गाऊनमधे कियारा आडवाणीचे हॉट फोटो...

बॅकलेस शिमरी गाऊनमधे कियारा आडवाणीचे हॉट फोटो शूट (Hotness Alert : Kiara Advani Stuns In Backless Shimmery Gown)

अलीकडच्या काळात कियारा आडवाणी आपले अंगप्रदर्शन करत पाहणाऱ्यांची कानशिले तापवित आहे. इन्स्टाग्राम वर नुकताच तिने असे बेहद्द बोल्ड फोटोशूट प्रसिद्ध केलं आहे. पाठ संपूर्ण उघडी टाकणारा शिमरी गाऊन तिनं घातला आहे. या गाऊनला हाय थाय स्लीट  पण आहे. त्यामुळे तिच्या उघडया मांडीचे दर्शन होत असून ती अधिकच सेक्सी दिसते आहे.

या अवतारात कियारा दिसतेय सुंदर आणि सेक्सी. तिचे हे रूप बघून मान्यवरांना कमेंट केल्याशिवाय राहवले नाही. डिझायनर मनीष मल्होत्रा, सामंथा प्रभू आणि जान्हवी कपूरने कमेंट्स दिले आहेत. जान्हवीने आगीचा इमोजी पोस्ट केला आहे. तर सामंथाने हृदयाचा इमोजी टाकून तिच्या ड्रेसची तारीफ केली आहे. मनीष मल्होत्राने पण आगीचा इमोजी देऊन आपली उत्तेजित अवस्था जाहीर केली आहे.

कियाराने चांगल्याच  सेक्सी पोझेस दिल्या. मात्र त्या दर्जेदार, अभिरुचीपूर्ण वाटत आहेत.
तिच्या कामकाजाबाबत बोलायचं तर कियारा नुकतीच ‘शेरशाह’ मध्ये दिसली होती. आता ती वरुण धवन सोबत ‘जुग जुग जियो’ मध्ये दिसणार आहे.