अभिनेत्रींची अजब फॅशन : टॉपच्या जागी फक्त ब्रा ...

अभिनेत्रींची अजब फॅशन : टॉपच्या जागी फक्त ब्रा घालून मिरवल्या… (Hot Bralette Tops Worn By Bollywood Actresses)

रुपेरी पडद्यावरील देखण्या दिव्यांनी फॅशनला एक वेगळंच रुप दिलं आहे. खऱ्या जीवनातही स्वतःची बोल्ड इमेज कायम राखण्यासाठी त्या काय करतील हे सांगता येत नाही. खरं तर ब्रा आपण अंर्तवस्त्र म्हणून वापरतो, परंतु या अभिनेत्री टॉपच्या जागी फक्त ब्रा घालून मिरवल्या… कधी साडी तर कधी इतर पेहरावासोबत ब्रा ची सांगड घालून तिलाही यांनी ग्लॅमरस बनवलं.
करीना कपूर जे काही घालते त्याची फॅशन बनते. साडीसोबतच्या ब्रालेट ब्लाऊजमध्ये ती अधिकच ग्लॅमरस दिसतेय्‌.

छोटी बहीण इतकी स्टायलिश असताना मोठीने मागे राहून कसं चालेल… करिश्माची ब्लॅक साडी आणि त्यावर घायाळ करणारी ब्रालेट…

तारा सुतारिया देखील अतिशय फॅशनेबल आहे. तिने साडीसोबतच नाही तर लेहंगा आणि स्कर्टसोबतही ब्रालेटची सांगड घातली आहे

अनन्या पांडे ही बाला जितकी सुंदर आहे तितकीच फॅशनेबल. अतिशय स्टाईलिश अंदाजात तिने पँटसूटसोबत ब्रालेटचा मेळ घातला आहे.

दीपिका पादुकोणने देखील अनन्याच्या स्टाईलने पँटसूट घातली आहे.

फॅशनच्या बाबत जॅकलीन अतिशय प्रयोगशील आहे. एकदा-दोनदा नव्हे तर अनेकदा ब्राच्या वेगवेगळ्या फॅशनेबल तऱ्हा तिने प्रदर्शित केल्या आहेत.

भूमि पेडणेकरने जॅकलीन सारखी फॅशन अनुसरून पाहिली आहे. खरं तर भूमिचा फॅशन सेन्स फारसा चांगला नाही, पण फॅशनेबल दिसण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे…

फॅशनेबल दिसण्यात जाह्नवी कपूर देखील काही कमी नाही, चमकदार साडीवर अतिशय खुबीने तिने ब्रालेट घातली आहे.

कतरीना कैफने अगदी सभ्यपणे ब्रालेट कॅरी केली आहे, ज्यामुळे ती सुपर स्टायलिश दिसत आहे.

कियारा आडवाणी चेहऱ्याने सोज्वळ वाटली तरी अतिशय ग्लॅमरस आहे. अनेकदा तिला लेहंग्यासोबत ब्रालेट घातलेलं पाहिलेलं आहे आणि बरेचदा कार्यक्रमांमध्येही ती अशा पेहरावामध्ये दिसते.