जान्हवी कपूरचे पुन्हा एकदा हॉट आणि ग्लॅमरस्‌ फो...

जान्हवी कपूरचे पुन्हा एकदा हॉट आणि ग्लॅमरस्‌ फोटो शूट; चाहत्यांना नेत्रसुखाची पर्वणी (Hot And Glamorous Photos Of Janhvi Kapoor Goes Viral On Social Media)

काही तरी कारण काढून जान्हवी कपूर चर्चेमध्ये येत असते. सोशल मीडियावर सक्रीय असलेली ही तरुण कलावती आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. अन्‌ या फोटोंमधून, प्रत्येक वेळी जान्हवीचे सौंदर्य आणि देहप्रदर्शन चाहत्यांना बघायला मिळते. आता पुन्हा एकदा तिने असेच आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो प्रसिद्ध केल्याने चाहत्यांना नेत्रसुखाची पर्वणी लाभली आहे.

जान्हवीचे जे फोटो मीडिया युजर्सच्या हृदयाची स्पंदने वाढवत आहेत, ते तिच्या मालदीव बेटावर घालवलेल्या सुट्टीचे आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी निऑन कलरमधील मोनोकिनीमध्ये अतिशय हॉट दिसते आहे. समुद्रकिनाऱ्यावर मनोवेधक हावभाव देऊन ती आपल्या चाहत्यांना मदहोश करत आहे. मोनोकिनी सोबत श्रग आणि न्यूड मेकअपने तिचे रुप परिपूर्ण बनवले आहे. जान्हवीचे हे गरमागरम फोटो तिच्या चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

हे फोटो टाकण्याआधी जान्हवी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करोनाशी झुंज देणाऱ्या लोकांना मदत करण्याचे आवाहन करत होती. या दरम्यान तिची एक पोस्ट चर्चेत आली. त्याचबरोबर तिने असाही खुलासा केला होता की, हे फोटो सुट्टी घालविण्याच्या काळातील एका नियतकालिकाच्या कव्हरसाठी केलेले आहेत.

त्याशिवाय जान्हवीने कॅप्शन लिहून आपल्या चाहत्यांना असाही विश्वास दिला की, ती लॉकडाऊनच्या काळात बिलकूल सुरक्षित आहे आणि हे फोटो म्हणजे आपल्या कामाचा भाग आहे. हे फोटो लॉकडाऊनच्या आधी घेण्यात आले होते, असेही तिने लिहिले. करोना संदर्भात आम्ही सुरक्षित आहोत. तुम्ही सर्व जण असेच सुरक्षित असाल, अशी आशा आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

जान्हवीच्या कामकाजाबाबत बोलायचं झालं तर ‘रूही’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अन्‌ तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. आता ती करण जोहर निर्मित ‘दोस्ताना २’ या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.