प्रिया वारियरचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट (Hot And ...

प्रिया वारियरचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट (Hot And Bold Photo Shoot Of Priya Warrier)

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जिथे एखादी गोष्ट पोस्ट केली आणि ती खूप व्हायरल झाली की मग त्या व्हिडिओतील गोष्टीला खूप प्रसिद्धी मिळते. असचं काही वर्षांपूर्वी एका साऊथकडील चित्रपटाची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओत एक शाळेतली मुलगी एका मुलाला डोळा मारत होती. पण तिच्या त्या डोळ्या मारण्यामुळे सगळेच जण घायाळ झाले होते. तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, ती मुलगी रातोरात स्टार झाली.

ती मुलगी होती साऊथकडील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर.

प्रियाचा जेव्हा व्हिडिओ व्हायरल झालेला तेव्हा डोळा मारताना तिचे हावभाव पाहून लोक तिचे चाहते झाले होते. आपल्या डोळ्यांनी सर्वांना आकर्षित करणारी प्रिया खूप कमी वयातच स्टार बनली होती. ती सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते.

युजर्सना प्रियाचे हावभाव आणि अदा खूप आवडतात. डोळा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोक तिला विंक गर्ल म्हणून ओळखू लागले.

 या व्हिडिओमुळे तरुण मुलांसोबतच विवाहित पुरुष देखील तिचे चाहते झाले होते.

प्रिया सोशल मीडियावर रोज काहीना काही पोस्ट करतच असते. प्रियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक सुंदर फोटो पाहायला मिळतील. आता नुकतेच तिने एक फोटोशूट केले होते ज्यात ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत होती.

तिच्या त्या फोटोंवर अनेकजणांनी कमेंट आणि लाइ्क्स केले आहे. प्रियाने या पोस्टमध्ये टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. तसेही अनेकदा ती बोल्ड फोटो शेअर करतच असते. तशातच आता आणखी काही फोटोंची भर पडली आहे. प्रियाच्या चाहत्यांनी तिच्या नव्या फोटोचे खूप कौतुक केले आहे.